धक्कादायक..नाशिकमध्ये उच्चशिक्षित नववधूची ‘ तसली ‘ टेस्ट घेण्याचा अघोरी प्रकार ?

शेअर करा

शिक्षण आणि ज्ञान याचा काडीचाही संबंध नाही, असे दाखवणारे अनेक प्रकार रोज समाजात उघडकीस येत असतात. अशीच एक धक्क्कादायक घटना नाशिक इथे उघडकीस आली असून चक्क उच्च शिक्षण झालेल्या एका नववधुकडे देखील जातपंचायतीने कौमार्य चाचणी घेण्याची मागणी केलेली आहे. विशेष म्हणजे मुलीचा होणारा नवरा हा मर्चंट नेव्हीमध्ये असून तसा अर्ज अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे आला आहे .

नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावर एका हॉटेलमध्ये एका विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यातील नववधू ही उच्चशिक्षित डॉक्टर असून वर हा मर्चंट नेव्हीत काम करतो मात्र लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी होणार असल्याचा तक्रार अर्ज अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे आला आणि त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आला.

कशी होते कौमार्य चाचणी ?

लग्नानंतर यात फक्त वधूची कौमार्य याचणी घेतली जाते यात जातपंचायत आपण दिलेल्या पांढऱ्या शुभ्र वस्त्रांवर वर आणि वधूंना झोपायला सांगते. त्यानंतर त्यांच्यातील शारीरिक संबंधादरम्यान जर या कपड्यांवर रक्ताचा डाग पडला तरच ते लग्न ग्राह्य धरले जाते अन्यथा लग्न अमान्य केले जाते. जर असे झाले नाही तर वधूच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करत तिला आणि तिच्या पालकांना शिक्षा केली जाते आणि त्यांच्याकडून खूप मोठा आर्थिक दंड वसूल केला जातो किंवा पूर्ण कुटुंबाला वाळीतही टाकले जाते

कौमार्य चाचणीविरोधात लढा देणारे जातपंचायत मूठमाती अभियानानेच राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे म्हणाले की, आमचा जात पंचायतीविरोधात लढा सुरू आहे. इथल्या कुप्रथा थांबवायच्या आहेत. एक समाज लग्नादिवशी कौमार्य चाचणी घेतो. हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. खरे तर चारित्र्य आणि कौमार्याचा काहीही संबंध नसतो. केवळ जुनाट प्रथेच्या नावाखाली अमानुषता सुरू असून या अघोरी प्रथा थांबल्या पाहिजेत. त्या समाजावर कलंक आहेत. त्यामुळे आम्ही पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


शेअर करा