कोल्हापूर हादरले..दुसऱ्याच्या बायकोचा अश्लील व्हिडीओ तिच्या पतीच्या मोबाईलवर पाठवून ‘भलतीच ‘ मागणी

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना कोल्हापूर इथे उघडकीस आली आहे. आरोपीने चक्क फिर्यादीच्या बायकोचे सोशल मीडियावरील फोटो घेऊन ते मॉर्फ करत फिर्यादीला ब्लॅकमेल केल्याचा प्रयत्न केल्याने कोल्हापूर इथे एकच खळबळ उडालेली आहे. आरोपीने मोबाइल कंपनीतील एका कर्मचाऱ्याकडून 45 हजार रुपये उकळले असून कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राहूल यादव असं गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचं नाव आहे तर फिर्यादी तरुण हा एका मोबाइल कंपनीच्या फायबर ऑप्टिक विभागात काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी आरोपी राहूल यादव याने फिर्यादीला ‘ आमच्याकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी उच्चभ्रू महिला उपलब्ध आहेत ‘, असा फोन केला होता तसेच तुम्हाला हवी असेल तर आम्हाला कळवा, असेही राहुल यादव हा म्हणाला होता.

त्यांच्यामध्ये हे संभाषण झाल्यावर आरोपीने काही तरुणींचे फोटो फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवले आणि थोडया वेळाने ‘ तुम्हाला आवडलेली मुलगी बुक केली आहे. तसेच हॉटेलमधील रुमही बुक केली आहे ‘, असं सांगितलं आणि पेमेंट करण्यास सांगितले . फिर्यादी यांनी आपण कोणतीही मुलगी बुक केली नाही आणि पुन्हा त्रास देऊ नका, असे सांगितल्याने आरोपी चिडला आणि त्याने हॉटेल रूम बुक केल्याचे 15 हजार रुपये लगेच पाठवा, असे सांगितलं मात्र फिर्यादीनं पैसे पाठवण्यास नकार दिला त्यामुळे राहुल यांचा संताप अनावर झाला.

फिर्यादीचं आणि त्याच्या पत्नीचं फेसबुकवर अकाऊंट आहे. याचा फायदा घेत संशयित आरोपी राहुल याने फिर्यादीच्या बायकोचे फोटो सोशल मीडियावरून चोरले आणि संबंधित फोटो पॉर्न व्हिडीओमध्ये मॉर्फ केले आणि त्यानंतर आरोपीनं संबंधित व्हिडीओ फिर्यादीच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 45 हजार रुपये उकळले. इतके पैसे देऊनही आरोपीचे समाधान झाले नाही त्याने पुन्हा आणखी पैसे मिळावेत म्हणून त्रास देण्यास सुरुवात केली त्यामुळे फिर्यादीने अखेर कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला