देश हादरला. ..’ मला माफ कर ‘ म्हणत योगशिक्षिकेने चक्क तरुणाचे गुप्तांग नेले कापून

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना राजस्थानमधील जयपूर इथे उघडकीस आली आहे. ३५ वर्षीय योगशिक्षिकेने २८ वर्षीय मित्राचं गुप्तांग कापल्याची ही धक्कादायक घटना असून सदर मित्र हा देखील योगशिक्षक असल्याचे समजते. पीडित योगशिक्षकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रकाराचा कसून तपास सुरू केला आहे. जयपूरमधील भांकरोटा पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

उपलब्ध माहितीनुसार , पीडित पुरुष योगशिक्षक हा मूळचा बिकानेर येथील असून गेल्या तीन वर्षांपासून जयपूरमध्ये राहून शिक्षण घेत आहे आणि योगशिक्षक म्हणून देखील कार्यरत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याची एका महिलेशी ओळख झाली त्यानंतर दोघांत मैत्री वाढली आणि नंतर ते एकमेकांच्या घरीही येऊ-जाऊ लागले.

१६ नोव्हेंबर रोजी पीडित पुरुष योग क्लास संपल्यानंतर तो घरी जात असताना त्या योगशिक्षिकेने त्याला तिच्यासाठी दूध आणि भाजीपाला आणायला सांगितलं. पीडित व्यक्ती हा ते सामान घेऊन त्या महिलेच्या गांधी पथावरच्या फ्लॅटमध्ये गेला. महिलेने त्याच्यासाठी जेवण तयार केलं आणि तिथेच त्याने जेवण देखील केले. जेवण झाल्यावर जेव्हा तरुण आपल्या घरी निघाला तेव्हा महिला देखील त्याच्यासोबत त्याच्या घरी आली मात्र घरी पोहोचताच तरुणाला चक्कर येऊ लागली त्यामुळे तो तिथेच बेडवर झोपला.

रात्री दोन वाजण्याच्या सुमारास त्याला जाग आली तेव्हा गुप्तांगाजवळ त्याला वेदना होत असल्याची जाणीव झाली त्याने महिलेला आवाज दिला असताना ती गायब झाली होती. तरुणाने स्वतः त्याचे शरीर चेक केले असता त्याचे गुप्तांग कापून नेल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने महिलेला फोन केला असता तिने फोनवर ‘ मला माफ कर ‘ असे म्हणत ती तिथे आली आणि त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर तरुणाने महिलेच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.


शेअर करा