महाराष्ट्र हादरला..’ तुझी मैत्रीण नाही तर तू ‘ , चक्क पोलीस कर्मचाऱ्याकडून युवकावर अत्याचार

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये उघडकीस आली आहे . पोलीस कर्मचाऱ्याच्या या धक्कादायक प्रकाराने पोलीस दलाची मान खाली गेली आहे . इस्लामपूर शहरात उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या २१ वर्षीय युवकावर पोलिसानेच अनैसर्गिक अत्याचार केल्याची घटना रविवारी उशिरा उघडकीस आली आहे.

पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवक अत्यंत सामान्य कुटुंबातील असून तो सध्या उच्च महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. २७ ऑक्टोबरच्या रात्र गस्तीसाठी संशयित पोलीस हणमंत देवकर आणि अन्य एक कर्मचारी नियुक्त गस्त घालत होते त्यावेळी पहाटे तीनच्या सुमारास पीडित युवक त्याच्या परगावच्या मैत्रिणीस भेटून आपल्या वसतिगृहाकडे निघाला होता. हणमंत देवकर व अन्य कर्मचाऱ्याने त्याची चौकशी केली आणि त्याचा मोबाईल नंबर लिहून घेतला.

दोन दिवसांनी हणमंत देवकर युवकाच्या महाविद्यालयाच्या परिसरात गेला आणि त्याला संपर्क करून बाहेर बोलावून घेतले. तुझ्या मैत्रिणीचे आणि तुझे प्रेमप्रकरण सुरु आहे याची माहिती घरी देणार, अशी धमकी देत युवकांकडून चार हजार रुपये गुगल पेद्वारे देवकर याने उकळले मात्र त्यावरही त्याचे समाधान झाले नाही. ‘तुझ्या मैत्रिणीचा नंबर दे. तिला माझ्यासोबत शरीरसंबंध करायला सांग,’ असा तगादा देवकर याने लावला . युवकाने त्याला नकार दिल्यावर देवकरने त्याच्याकडेच शरीरसंबंध ठेवण्याची मागणी केली आणि दमदाटी करत देवकर पीडित युवकाला जबरदस्तीने त्याच्या खोलीवर घेऊन गेला आणि तेथे त्याने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.

युवकाच्या म्हणण्यानुसार हा धक्कादायक प्रकार २९ ऑक्टोबरला घडला आणि देवकर याने या अत्याचाराची क्लिप बनवली आणि ही क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत रविवारी पुन्हा अनौसर्गिक सेक्स करण्याची मागणी या पोलिसाने केल्यावर युवकाने पोलिसात धाव घेतली. संशयित पोलिसाने पीडित युवकाकडून चार हजाराची खंडणीसुद्धा उकळली आहे. हणमंत कृष्णा देवकर (३४, रा. राजेबागेश्वरनगर, इस्लामपूर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.