पुणे हादरले.. ३६ वर्षीय विवाहितेने ‘ तसल्या ‘ मोहापायी परळी गाठली अन त्यानंतर..

पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून एका विवाहित महिलेला बीडमध्ये नेऊन तिच्यावर सलग दोन दिवस आरोपीने अत्याचार केले असल्याचे महिलेचे म्हणणे आहे .आरोपी तरुणानं परळीत नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याच्या बहाण्यानं बीड जिल्ह्यातील परळी इथे नेलं होत मात्र परळीत आल्यावर तिच्यावर सलग दोन दिवस अत्याचार करण्यात आले. पीडित महिलेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला जेरबंद केलं आहे .

उपलब्ध माहितीनुसार, गणेश कोडी असं अटक करण्यात आलेल्या 24 वर्षीय तरुणाचं नाव असून तो परळी शहरात राहतो.संशयित आरोपी गणेश यानं 36 वर्षीय विवाहितेला नोकरी देण्याच्या आणि राहण्यासाठी घर देण्याचे आश्वासन देत परळी इथे नेले आणि 19 आणि 20 नोव्हेंबर रोजी विवाहितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपीच्या त्रासाला कंटाळून पीडित विवाहितेनं परळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

36 वर्षीय पीडित महिला विवाहित असून ती पुण्यातील रहिवासी असून मूळची ती सोलापूर येथील आहे. गेल्या काही दिवसांपासून पीडित महिला आर्थिक अडचणीचा सामना करत असल्याने ती नोकरीच्या शोधात होती याचदरम्यान ती आरोपीच्या संपर्कात आली. आरोपीनं ‘तुला नोकरी लावतो, तुला राहण्यासाठी घर देतो’ असं सांगून तो तिला पुण्याहून बीड जिल्ह्यातील परळी इथे घेऊन आला.

आरोपीनं परळी इथे पीडितेवर सलग दोन दिवस अत्याचार केला आहे. यापूर्वीही आरोपीनं वेळोवेळी अत्याचार केल्याचं पीडितेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. आरोपी गणेश कोडी याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.