औरंगाबाद हादरले..एकाच झाडाला गळफास घेत युवक युवतीचा भयावह शेवट

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना औरंगाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे .सिल्लोड तालुक्यातील जळकी बाजार गावात एका युवक युवतीनं शेतातील झाडाला गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. सोमवारी सकाळी संबंधित घटना उघडकीस आली असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असली तरी तपास सुरु असल्याचे समजते.

उपलब्ध माहितीनुसार, राजनंदिनी कैलास दांडगे (16) आणि शरद आस्तिकराव दांडगे (20) असं आत्महत्या करणाऱ्या युवक युवतीचं नाव आहे. सोमवारी सकाळपासूनचं युवती घरात दिसत नसल्याने घरच्यांनी तिचा शोध घ्यायला सुरुवात केली असता शेताकडे जाऊन पाहणी केली असताना राजनंदिनी आणि शरद दोघंही बांधावरील एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

संबंधित युवक युवतीनं सोमवारी पहाटे 5 ते 6 च्या सुमारास एकत्रित आत्महत्या केली असावी, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. अजिंठा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून तपासाला सुरुवात केली आहे.