निर्वस्त्र अवस्थेत ‘ ती ‘ रस्त्यावर धावत होती मात्र चौकशी करताच बाहेर आले धक्कादायक सत्य

  • by

युवतीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर त्याने तिला रस्त्यावरच सोडून दिले त्यानंतर ती बराच वेळ निर्वस्त्र अवस्थेत रस्त्यावर सैरावैरा धावत होती मात्र मग काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी त्या तरुणीची चौकशी केली आणि धक्कादायक सत्य बाहेर आले. तरुणीच्या सांगण्यानुसार तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून अभय बाबूराव कडू (वय ५८ रा.आनंदनगर, सिंहगड रोड, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना नगर शहरात घडली आहे

पीडित तरुणी ही मूळची वर्धा जिल्ह्यातील असून औरंगाबाद इथे राहत होती. काही दिवसापूर्वी आरोपी हा औरंगाबाद इथे गेला होता त्या दरम्यान त्याची सदर तरुणीवर नजर पडली आणि तो तिला पुण्याला घेऊन गेला. एक महिनाभर पुण्यात त्याने तिला त्याच्यासोबत ठेवले . त्यानंतर कारमधून प्रवास करत असताना नगर कल्याण रोडच्या पुलाजवळ त्याने तिला विवस्त्र करून तिच्यावर अत्याचार केला. पीडित तरुणी यामुळे घाबरली आणि गाडीबाहेर पळाली.

सदर युवतीवर वाहनामध्ये लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (२० जुलै) पहाटे घडली. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडित युवतीला तसेच रस्त्यावर सोडून दिले. सोमवारी नगर शहरातील चांदणी चौक इथे एक तरुणी निर्वस्त्र अवस्थेत धावत असल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आली. स्थानिक नागरिकांनी ह्या युवतीबद्दलची माहिती माऊली सेवा प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला दिल्यानंतर संस्थेच्या डॉ. सुचिता धामणे तिथे आल्या . त्यावेळी पीडित तरुणी ही माझ्यावर कडू नावाच्या व्यक्तीने अत्याचार केला,असे ओरडून सांगत होती.

डॉ. सुचिता धामणे सदर तरुणीस आपल्या संस्थेत घेऊन केल्या आणि मुलीला विश्वासात घेऊन विचारले असते तिने अभय कडू नावाच्या व्यक्तीने तिच्यावर अत्याचार केल्याचे सांगत तिने सर्व घटनाक्रम सांगितला. पुणे येथून अभय कडू याच्याबरोबर येत असताना त्याने नगरच्या जवळ रेल्वेपूल ओलांडल्यानंतर गाडी अंधारात थांबवली व अत्याचार केला असे पीडितेने सांगितले आहे .

डॉ. सुचिता धामणे यांनी याबाबतची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी अभय बाबुराव कडू याच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे आरोपी कडू याने हे प्रकरण अंगावर येऊ नये म्हणून सोमवारी सकाळी तोफखाना पोलीस स्टेशन इथे येऊन सदर तरुणी ही माझ्या मित्राची मुलगी असून ती मनोरुग्ण असून हरवली आहे अशी तक्रार देखील दिली होती.