नगर हादरले..प्रेयसी गर्भवती होताच प्रियकराकडून ‘असा ‘ निर्णय की..

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना नगर येथे उघडकीस आली असून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय प्रियकराने प्रेयसीला गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास दिल्याने तिचा एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरून , आरोपी सईद ताहीर बेग ( वय 33 राहणार संजय नगर काटवन खंडोबा अहमदनगर ) याच्या विरोधात सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार, सईद ताहीर बेग याने मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यासोबत संबंध ठेवले आणि तिच्यावर अत्याचार केले. सातत्याने हा प्रकार घडल्याने यातून पीडित मुलीला दिवस गेले त्यावेळी तिने लग्नाची मागणी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर देखील डॉक्टरकडे घेऊन जाण्याऐवजी त्याने तिला तिचा गर्भपात करण्यासाठी गोळ्या आणून दिल्या त्या गोळ्या मुलीने खाल्ल्यानंतर तिला पोटदुखी आणि उलटीचा त्रास सुरू झाला.

अतिरिक्त स्त्रावाने तिची प्रकृती आणखी गंभीर झाली त्यानंतर तिला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूबद्दल आरोपी सईद ताहीर बेग याच्या विरोधात सदोष मनुष्यवध, अत्याचार आणि ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी सईद याला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.