फॅक्ट चेक : डीएसकेंचा खरोखर एका आमदाराने चावा घेतलाय का ? धक्कादायक सत्य समोर

शेअर करा

पुण्यातील व्हाट्सएप्प ग्रुपमध्ये सध्या एक बातमी चांगलीच व्हायरल होत असून पुणे येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी हे सध्या कारागृहात आहेत मात्र येरवडा कारागृहात असलेल्या एका आमदाराने कारागृहात त्यांचा चावा घेतल्याची ही बातमी आहे. सदर बातमी ही चांगलीच व्हायरल झाली असून महाराष्ट्र टाइम्सने या बातमीचे फॅक्ट चेक केले असताना या घटनेमागील सत्य समोर आले आहे.

महाराष्ट्र टाइम्सकडून येरवडा कारागृहाच्या अधीक्षक राणी भोसले यांच्याशी संवाद साधला असता , ‘ डीएसके हे साधारण २० दिवसांपूर्वी घसरून पडले होते त्यामुळे त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले होते. त्यावर ससून रुग्णालयात उपचार करून पुन्हा कारागृहात आणण्यात आले आहे. त्यांची प्रकृती उत्तम असून ते सुखरूप आहेत तसेच सध्या सोशल मीडियावर डीएसके बाबत चुकीची आणि खोडसाळपणे माहिती पसरविली गेलेली असून आम्ही अशी बातमी पसरवणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहोत ‘ असे सांगण्यात आले आहे .

राज्यातील अनेक गुंतवणूकदाराची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मागील चार वर्षापासून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डीएसके येरवडा कारागृहात आहेत. बँक घोटाळ्यातील आरोपी असलेल्या एका आमदाराने त्यांच्या हाताला चावा घेतला. कारागृहात असताना सुद्धा बांधकाम व्यावसायिक बिनधास्त फिरतात त्यांच्यावर काहीही परिणाम होत नाही, याचा राग मनात घेऊन आमदाराने डी. एस. के. यांच्या हाताला चावा घेतला अशी खोटी माहिती पसरवली जात असून त्यामागील सत्य वेगळेच समोर आलेले आहे .


शेअर करा