गूढ उलगडले..कल्याणमधील रिक्षाचालकाच्या हत्येचे ‘ धक्कादायक ‘ कारण आले समोर

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असतानाच अशीच एक घटना कल्याण इथे उघडकीस आली होती. कल्याण मधील उंबर्डे गावात एका रिक्षाचालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी सोपान पंजे नावाच्या युवकाला अटक केली आहे. त्याने रिक्षा चालक अभिमान भंडारी याची धारदार शस्त्राने हत्या केली असल्याचे समोर आले आहे. खून इतक्या अमानुषपणे केला होता की हत्येची पद्धत पाहून पोलिसही चक्रावून गेले होते मात्र या हत्येत आता वेगळेच सत्य समोर आले असून अभिमान भंडारी या रिक्षाचालकाच्या अंगात असलेल्या विकृतीतूनच हा प्रकार घडलेला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, अभिमान भंडारी दररोज पहाटे आरोपी सोपान पंजे याच्या वहिनीच्या बेडरुमच्या खिडकीतून डोकावून पाहत होता. सोपान याने त्याला वारंवार समजावले देखील होते मात्र अभिमान भंडारी याच्या वर्तनात बदल होत नसल्याने आरोपीने त्याची धारदार शस्राने हत्या केली. आरोपी सोपान याने हत्येची कबुली दिली असल्याने सदर घटनेचे रहस्य उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे .

अभिमानला रात्रीच्या वेळेत लोकांच्या बेडरुमध्ये डोकावून पाहण्याची वाईट सवय होती. एका रात्री अभिमान वहिनीच्या घरातील खिडकीतून त्यांच्या बेडरुममध्ये डोकावत असल्याचं आरोपी सोपान पंजे याने त्याला पाहिलं होत. सोपानचा भाऊ एका प्रकरणात जेलमध्ये असून भाऊ नसल्याचा फायदा घेत अभिमान हा सतत सोपान याच्या वाहिनीच्या बेडरूममध्ये डोकावून पाहत होता .वारंवार सांगूनही अभिमान ऐकण्यास तयार नव्हता म्हणून सोपानने रागाच्या भरात अभिमानची धारदार शस्त्राने हत्या केली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांनी दिली.

अभिमान भंडारी याच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली होती. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी उमेश माने पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा छडा लावला.आरोपीच्या अटकेनंतर जी माहिती समोर आली ती अतिशय धक्कादायक आहे. अभिमानच्या विकृतीमुळेच त्याचा अंत झाल्याचे समोर आले आहे.