नगर हादरले..पहाटेच्या सुमारास सासऱ्याची अन सुनेची मारामारी अन काही मिनिटातच

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर नजीक चिचोंडी पाटील येथे घडलेली आहे. चारित्र्यावर सातत्याने संशय घेत असल्याने संतापलेल्या सुनेने सासर्‍याला दगडाने ठेचून मारहाण केली आणि त्यानंतर कुर्‍हाडीने वार करत त्याचा खून केला. नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे गराडी वस्तीवर सोमवारी मध्यरात्रीच्या नंतर ही घटना घडली. अर्जुन गोविंद हजारे ( वय 62 ) असे मयत व्यक्तीचे नाव असून ज्योती अतुल हजारे असे आरोपी महिलेचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, अर्जुन हजारे यांचा मुलगा अतुल हा गेल्या दोन वर्षापासून बेपत्ता आहे. त्यामुळे मयत हजारे हे आपली सून आणि नातवंड सोबत गराडी वस्ती येथे राहत होते. हजारे हे सातत्याने आपल्या सुनेच्या चारित्र्यावर संशय घेत होते आणि आणि त्यातून त्यांची याआधी देखील भांडणे झाली होती. सोमवारी मध्यरात्री त्यांचे ज्योती हिच्या सोबत भांडण झाले आणि भांडणाचे परावर्तन मारामारीत झाले. संतापलेल्या ज्योती हिने अर्जुन हजारे यांच्या डोक्यात, कपाळावर आणि तोंडावर दगड तसेच कुऱ्हाडीने मारहाण केली त्यात ते गंभीर जखमी झाले आणि आणि त्यांचा मृत्यू झाला.

मंगळवारी पहाटेच्या दरम्यान सासु आणि सुनेमध्ये अडीच वाजण्याच्या सुमारास भांडणे सुरू झाली. शेजाऱ्यांना जोराने याचा आवाज येऊ लागल्यानंतर त्यांनी या कुटुंबाचे नातेवाईक असलेले बाबासाहेब चंदु बनकर यांना याबद्दल खबर दिली. ते तातडीने चिचोंडी येथे आले असताना अर्जुन हजारे हे निपचित पडले होते आणि त्यानंतर हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. पहाटेच्या भांडणात सासरा गतप्राण झाला होता मात्र घटनेनंतरही ज्योतीने पळून जाण्याचा प्रयत्न केला नाही. तिने सकाळी मुलांसाठी स्वयंपाक केला आणि त्यांना जेवू घातले. पोलिस आल्यावर तिला अटक करण्यात आली. तिला पाच आणि आठ वर्षाची दोन मुले आहेत.

पहाटे साडेचारच्या सुमारास पोलीस पाटील संतोष खराडे यांनी नगर तालुका पोलीस स्टेशनला याबाबत खबर दिली आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करत सकाळी सव्वा नऊला मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवलेला आहे. मयत व्यक्तीचा नातेवाईक बाबासाहेब चंदु बनकर ( वय 42 राहणार पिंपळगाव माळवी तालुका नगर )यांनी याबद्दल फिर्याद दिली असून ज्योती हिला अटक करण्यात आलेली आहे.