नगर ब्रेकिंग..’ त्या ‘ महिलेच्या हातावर निर्मला गोंदलेले , खुनाचा कयास

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरानजीक घुलेवाडी गावाच्या हद्दीत उघडकीस आली आहे. माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील श्रमिक बिडी कामगार वसाहती जवळच्या सेफ्टी टँकमध्ये सुमारे 35 ते 40 वर्षे वयाच्या अनोळखी महिलेचा नग्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. सोमवारी 22 तारखेला ही घटना उघडकीला आली असून प्राथमिक अंदाजानुसार हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

संगमनेर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील घुलेवाडी शिवारातील माझे घर हौसिंग सोसायटी परिसरातील घर क्रमांक 424 व गट क्रमांक 63 मध्ये श्रमिक बिडी उद्योग संस्थेच्या बाहेरील बाजूला असलेल्या मोकळ्या जागेतील सेफ्टी टँक मध्ये हा मृतदेह आढळला आहे. संबंधित महिलेच्या अंगावर कपडे नाहीत तसेच तिच्या हातावर निर्मला असे नाव गोंदलेले आहे. सदर महिलेचा अज्ञात व्यक्तीने खून करून तिचा मृतदेह सेफ्टी टँक मध्ये टाकला असावा असा पोलिसांचा कयास आहे.