धक्कादायक..नववधू काकीचे वाकडे पाऊल अन एके दिवशी ‘ नको तेच ‘ घडलं

शेअर करा

देशात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून नुकतेच लग्न झालेली एक काकी नात्याने आपला पुतण्या असलेल्या व्यक्तीसोबत फरार झाली आहे . राजस्थान भरतपूरमध्ये ही घटना घडलेली असून नुकतेच लग्न झालेल्या काकीसोबत पुतण्याचे अफेअर सुरु झाले आणि अवघ्या काही दिवसात काकी आणि पुतण्या दोघे परस्परांच्या प्रेमात इतके आकंठ बुडाले की एकत्र राहण्यासाठी दोघे घरातून पळून गेले.

उपलब्ध माहितीनुसार , भरतपूरच्या मथुर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना उघडकीस आली असून किशनपूर कॉलनीमध्ये राहणाऱ्या काकाचं दोन वर्षांपूर्वी लग्न झालं होत. २४ वर्षाचा पुतण्या आणि १९ वर्षाच्या काकीमध्ये कधी प्रेमसंबंध सुरु झाले, हे कोणालाच कळलं नाही आणि त्यानंतर १६ ऑक्टोबरच्या रात्री दोघेही फरार झाले. पोलीस दोघांचा शोध घेत असून अद्यापपर्यंत त्यांना पकडण्यात यश आलेले नाही .

आपली बायको पळून गेल्यावर काकाच्या हा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली. आरोपीच्या काकांनी पोलीस स्टेशन गाठून पुतण्याविरोधात पत्नीला पळवून नेल्याची तक्रार नोंदवली आहे. १६ ऑक्टोबरच्या रात्री आपली पत्नी पुतण्यासोबत पळून गेली, असे काकाने पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. न्यूज एनसीआर वेबसाईटने हे वृत्त दिले आहे.

आपली पत्नी आणि पुतण्यामध्ये बऱ्याच काळपासून प्रेमसंबंध सुरु होते. मी त्यांना अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला पण याचा दोघांवर काही परिणाम झाला नाही. अखेर परिस्थितीचा फायदा उचलून दोघेही घरातून पळून गेले. या प्रकरणात आजीनेही नातवाविरोधात पोलिसात तक्रार नोंदवली आहे. नातू सूनेसोबत पळाल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे.


शेअर करा