शरद पवार-देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शहांची भेट ? ‘ त्या ‘ फोटोवर राष्ट्रवादीकडून खुलासा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्यात सत्तांतर होईल अशी भविष्यवाणी केली त्यामुळे नेमकं दिल्लीत काय शिजतंय ? असाच प्रश्न असतानाच नियोजित दौरा सोडून शरद पवार दिल्लीला रवाना झाल्याने राज्यातील परिस्थितीवरून चर्चाना उधाण आले. अशातच शरद पवार-देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाहांची भेट घेतल्याचा एक फोटो व्हायरल झाला असून राष्ट्रवादीकडून या फोटोचा उल्लेख ‘गजाल्या’ असा करण्यात आला आहे .

सदर फोटोबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन खुलासा केला असून राष्ट्रवादीने ट्विट करुन म्हटल आहे की, अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉफ् केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉफ् ला माफी नाही. फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. महाराष्ट्र सायबर सेलने असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे असं सांगत त्यांनी पोलिसांना या प्रकरणी शोध घेण्याचं विनंती केली. राष्ट्रवादीच्या अधिकृत हॅण्डलवरून हा फोटो ट्विट करून खुलासा करण्यात आल्याने हा फोटो बनावट असल्याचे दिसून येत आहे .

ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी सर्व कार्यक्रम रद्द करत दिल्लीसाठी रवाना झाले विशेष म्हणजे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेही दिल्लीतच आहेत. त्यामुळे पवारांच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील पुढील काही महिन्यात महाराष्ट्रात मोठा बदल दिसून येईल, असा मोठा दावा केल्यानं नेमकं राज्याच्या राजकीय वर्तुळात काय सुरु आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.