धक्कादायक..प्रेयसीने मामाच्या घरी आत्महत्या करताच तरुणाने केले ‘ असे काही ‘ की ?

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना नगर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या आत्महत्येची बातमी समजताच अवघ्या काही तासात तिच्या प्रियकरानेही आत्महत्या केल्याची घटना जामखेड तालुक्यातील आपटी या गावात घडली आहे.एकाच दिवशी प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक बंडू कडू ( वय 23 राहणार तालुका जामखेड ) याचे घोड़ेगाव येथील एका अल्पवयीन तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. बुधवारी 24 तारखेला सदर मुलीने मामाच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिने आत्महत्या केल्याची माहिती तिचा प्रियकर अशोक कडू याला समजली त्यानंतर तो खात्री करण्यासाठी मुलीच्या घरी गेला आणि आणि त्यानंतर त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला.

प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे समजताच प्रियकर अशोक कडू याने व्हाट्सअपवर मी देखील माझे जीवन संपवत आहे. असे स्टेटस ठेवून दुपारी तीनच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोघांच्याही मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, सहाय्यक निरीक्षक सुनील बडे आदी उपस्थित होते.


शेअर करा