‘ बघ तुझ्या बायकोच्या नावाचा टॅटू अन आमचे एकत्रित फोटो ‘ , महिला म्हणतेय की ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना कोल्हापूर येथे उघडकीस आली आहे. पतीला प्रेमप्रकरण सांगतो अशी धमकी देऊन दोन जणांनी एका महिलेला तब्बल तीन लाख 80 हजार रुपयांना गंडा घातला आहे, आपली फसवणूक झाल्याची जाणीव झाल्यानंतर या महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत रविराज खेडेकर ( वय 32 ) व रितेश खाडे ( वय 37 ) या दोन संशयितांना अटक केली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, संशयित आरोपी रविराज खेडेकर याने आधार कार्ड आणि ओळख पत्र द्या मी पीडब्ल्यूडीचे कामे पाहतो. त्याची बिले अवघ्या 40 दिवसात मिळतात, त्या बदल्यात मी तुम्हाला दहा हजार रुपये जादा रक्कम देईल असे म्हणत पैशांसाठी वारंवार संपर्क केला. महिलेशी संपर्क केल्यानंतर पीडित महिलेला आणि तिच्या कुटुंबियांना धमकी देऊन त्रास द्यायला सुरु केले. त्यानंतर ब्लॅकमेल करत खेडेकर याने 80 हजार रुपयांची रोकड आणि तीन लाख रुपये सोन्याचे दागिने महिलेकडून हस्तगत केले.

धक्कादायक बाब म्हणजे रितेश खाडे याने सदर पीडित महिलेला एका कॉफी शॉपमध्ये बोलावले आणि आणि स्वतःच्या हातावर पीडित महिलेच्या नावाचा टॅटू गोंदवून घेतला. त्यानंतर दोघांचा एकत्रित फोटो काढून दोघांचे प्रेम प्रकरण असल्याचे तुझ्या पतीला सांगेल, अशी धमकी दिली.

त्यानंतर त्याने तिच्या महिलेच्या पतीला फोन करून तुमच्या पत्नीचे माझ्या सोबत प्रेम प्रकरण आहे असे सांगितले. आपल्या सोबत झालेल्या या धक्कादायक प्रकारानंतर महिला हादरून गेली आणि तिने राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा