तुझ्यासाठी ‘ त्या ‘ वस्तू पाठवल्या आहेत, एकतीस वर्षीय तरुणी झाली पागल अन ..

महाराष्ट्रात फसवणुकीचे अनेक प्रकार या आधी देखील उघड झालेले आहेत मात्र तरीदेखील नागरिक अशा आमिषाला बळी पडतात आणि स्वतःला फसवून घेतात. एकदा फसवणूक झाली की मग पोलिस ठाण्याची धाव घेतात त्यामुळे अशा असंख्य तक्रारी पोलिसांकडे येत आहेत, असाच एक प्रकार जळगाव येथे उघडकीस आला असून सोशल मीडियावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवत परदेशातून एक कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने मी फक्त तुझ्यासाठी पाठवले आहेत, असा बहाणा करत एका व्यक्तीने युवतीला आपल्या जाळ्यात ओढले.

दिल्ली विमानतळावरून कस्टम आणि जीएसटी भरण्याच्या करण्याच्या नावाखाली 31 वर्षीय तरुणीला वेळोवेळी पैशाची मागणी करण्यात आली आणि तब्बल दोन लाख 55 हजार पाचशे रुपयांना ऑनलाइन गंडा घालण्यात आला. निवांत चित्रे अशा नावाने संपर्क करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील 31 वर्षीय तरुणीचा विवाह जुळवणार्‍या एका वेबसाईटवर निवांत चित्रे असे नाव सांगणाऱ्या व्यक्तीशी संपर्क झाला होता. त्याने तरुणीशी वेगवेगळ्या क्रमांकावरून संपर्क साधत हळूहळू तिच्यासोबत सलगी वाढवली आणि आणि त्यानंतर तिला लग्नाचे आश्वासन दिले. सतत संपर्क करत असल्याने रोजच्या होणाऱ्या बोलण्यामधून तरुणीचा त्याच्यावर विश्वास वाढत गेला आणि अशाच प्रकारात काही दिवस निघून गेले.

एके दिवशी परदेशातून एक पार्सल पाठवून त्यात सोन्याचे दागिने व 1000 पाऊंडचे चलन ज्याची भारतीय किंमत एक कोटी रुपये आहे, अशा वस्तूदेखील मी तुझ्यासाठी पाठवले आहेत, असे त्याने सांगितले. मात्र दिल्ली विमानतळावर कस्टम आणि जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही असे सांगून संशयित व्यक्तीने चार नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत वेळोवेळी या तरुणीला भुलवत तब्बल 2 लाख 55 हजार पाचशे रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले मात्र मधल्या काळात कुठलेही पार्सल आले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाली याची या तरुणीला जाणीव झाली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली.