सलोनीच्या ‘ ह्या ‘ भन्नाट डान्सची राज्याच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील घेतली दखल : पहा व्हिडीओ

  • by

आपल्याला रोगाशी सामना करायचा आहे, रुग्णाशी नाही हे आपण सगळे ऐकत असलो तरी कोरोना नाव ऐकले की अशा व्यक्तींपासून लोक थोडे अंतर ठेवूनच वागतो. अनेकदा बऱ्या झालेल्या रुग्णाला देखील ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो. ह्याच पार्श्वभूमीवर सध्या एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे .

व्हायरल व्हिडिओमध्ये सलोनी सातपुते नावाची एक तरुणी तिची बहिण कोरोनावर मात करुन घरी आल्यानंतर चक्क रस्त्यावर उतरुन गाणं लावून मनमोकळेपणाने नाचते आणि आपला आनंद व्यक्त करते. सलोनीचा हा भन्नाट डान्स सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. कोरोना रुग्णांसाठी सलोनीने घेतलेल्या या पुढाकाराची दखल राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील घेतली आणि सलोनीचा नंबर शोधून तिच्याशी संपर्क साधला. यशोमती ठाकूर यांचा फोन आल्यावर सलोनी देखील भारावून गेली.

सलोनी हिच्या बहिणीला कोरोनाची लागण झाली होती . सुदैवाने सलोनीची बहीण कोरोनावर मात करून घरी परतली. बहीण घरी येणार म्हटल्यावर सलोनीने म्युजिक सिस्टिम लावून ठेवली होती. बहीण आलेली दिसताच सलोनी गाणे सुरु करते आणि बिनधास्त डान्स करते असा हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ पोस्ट होताच प्रचंड वेगाने व्हायरल झाला.

आपल्याला रोगाशी सामना करायचा आहे, रुग्णाशी नाही, हा संदेश देणाऱ्या सलोनीला भेटायची इच्छा यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार, यशोमती ठाकूर यांनी सलोनीचा नंबर शोधून काढून तिच्याशी संपर्क साधला. राज्याच्या महिला बालविकास मंत्र्यांकडून थेट फोन आल्यानंतर सलोनी देखील भारावून गेल्याचे पहायला मिळाले. .