ओमिक्रॉन व्हेरियंट नेमका कसा आणि लसीकरण झालेल्यांना कितपत धोका ?

शेअर करा

आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन नावाच्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली असून अमेरिकेसह कॅनडा व इतर देशांनी पावले उचलायला सुरुवात केली आहे . भारत देखील ओमिक्रॉनला गांभीर्याने घेत असून मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित पूर्ण इमारत सील करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर राज्यात नवीन नियमावली देखील लागू करण्यात आलेली आहे .

जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 असे म्हटले असून त्याला Omicron असे नाव देण्यात आले आहे. दक्षिण आफ्रिकेत या आठवड्यात प्रथमच कोरोनाचा हा नवीन समोर आला असून करोनाचा नवीन विषाणू ओमिक्रॉन हा नागरिकांसाठी धोकादायक ठरण्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्ती केली आहे .

ओमिक्रॉन हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणू असून पूर्णपणे लसीकरण झालेल्या आणि बूस्टर डोस घेतलेल्या नागरिकांनाही याचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. इस्रायलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तीला कोरोनाच्या लसीच्या दोन्ही डोससह तिसरा बूस्टर डोस देण्यात आला होता मात्र तरीही नवीन विषाणूने त्याला गाठले आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू डेल्टासह इतर कोणत्याही प्रकारांपेक्षा अतिशय वेगाने पसरतो, असे शास्त्रज्ञांच्या तपासातून समोर आले आहे.

ओमिक्रॉनमध्ये अनेक स्पाइक प्रोटीन म्युटेश (बदल) आहेत आणि तो अत्यंत संसर्गजन्य आहे. ओमिक्रॉन हा ग्रीक शब्द असून दक्षिण आफ्रिकेत जिनोमिक्सचे निरीक्षण करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने अलिकडेच एक नवीन प्रकार शोधून काढला आणि त्याला B.1.1.529 असे नाव दिले आणि त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने ‘ओमिक्रॉन’ असे या नवीन विषाणूचे नामकरण केले आहे. ओमिक्रॉन हा अधिक अत्यंत संसर्गजन्य आणि रोगप्रतिकारक शक्तीवर वेगाने मात करण्यात कार्यक्षम आहे, असे डॉक्टर आणि तज्ज्ञांच्या पथकाचे म्हणणे आहे कारण बूस्टर डोस घेणाऱ्यांनाही या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे.


शेअर करा