पुणे हादरलं..अत्याचार करून म्हणाला ‘ आता मी बॉर्डरवर चाललोय ‘

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. आरोपीनं आपण लष्करात असल्याचं सांगून पीडितेला लग्नाचं आमिष दाखवलं आणि तिच्यावर अत्याचार केला मात्र त्यानंतर त्याने फोन बंद करून टाकला. वारंवार संपर्क करूनही काहीच फायदा नाही हे लक्षात आल्यावर पीडितेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने पोलिसात धाव घेतली. पीडित तरुणीनं सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे .

उपलब्ध माहितीनुसार, प्रशांत भाऊराव पाटील असं अटक केलेल्या 31 वर्षीय आरोपीचं नाव असून तो बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील कुंपटगिरी येथील रहिवासी आहे. एका संकेतस्थळावर पीडित तरुणी आणि याची ओळख झाली होती त्यावेळी त्याने आपण सैन्यात कामाला असल्याचे सांगून तरुणीला आपल्या जाळ्यात ओढले. आरोपीनं पीडितेला पुण्यातील दगडुशेठ मंदिरात भेटायला बोलावलं आणि ‘ आपण इथून आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करू ‘ असे सांगत परिसरातील एका लॉजवर घेऊन गेला.

लॉजवर पोहचल्यावर पीडितेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिला असता आरोपीने तिला ‘ मी दिवसरात्र दहशतवाद्यांशी लढतो अन तू माझ्यासाठी एवढंही करू शकत नाही ‘, असे विचारत तिच्या भावनांना हात घातला. पीडित तरुणी भावनावश झाली आणि आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. त्यावेळी तिने ओरडा करू नये म्हणून या ठगाने चक्क तिला सैन्याची शपथही घातली.एकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर आरोपीने आता मी बॉर्डरवर चाललोय, असे सांगत पीडितेला शनिवारवाडा परिसरात सोडून देत पळ काढला.

पीडितेनं आरोपीला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याने पीडितेला ब्लॉक केल्याचं लक्षात आलं आणि तरुणीने सिंहगड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली.आरोपी सैन्य दलात भरती झाल्यानंतर आरोपी 2018 पासून कर्तव्यावर रुजू झालाच नाही मात्र अशाच स्वरूपाचे गुन्हे त्याने नगर, पुणे आणि लातूर परिसरात पाच गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 1 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.


शेअर करा