सर्वात मोठी बातमी..ओमिक्रोन अखेर भारतात दाखल झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून पुष्टी

शेअर करा

ओमायक्रोनच्या दहशतीने जग धास्तावलेले असतानाच आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ओमायक्रोन भारतात दाखल झाल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे . केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक 15 डिसेंबरपर्यंत बंद केली होती मात्र अखेर भारतात कोरोनाच्या ओमायक्रोन या नव्या विषाणूने शिरकाव केला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषद घेतली त्यात ही माहिती देण्यात आलेली आहे .

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोन जणांना ओमायक्रोनची लागण झाल्याची माहिती वैद्यकीय तपासातून समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. कर्नाटकात 66 आणि 46 वर्षांच्या दोन व्यक्तींना ओमायक्रोन विषाणूची लागण झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी काय म्हणाले ?

गेल्या 24 तासात दोन रुग्णांना ओमायक्रोनची बाधा झाल्याचं आमच्या टीमच्या निदर्शनास आलं आहे. या दोघांचे रिपोर्ट काल रात्र उशिरा आले होते. दोन्ही रुग्ण हे पुरुष असून त्यापैकी एकाचं वय हे 66 तर दुसऱ्याचं 46 वर्ष आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व प्रायमेरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट्सला ट्रेस करण्यात आलं आहे. त्या सगळ्यांची टेस्ट करुन आम्ही त्यांच्याशी कोऑर्डीनेट करत आहोत .

आमच्याकडे आज सगळ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत पण आमचे वैज्ञानिक आणि डॉक्टर या संशोधन करत आहेत. ज्या देशांनी या विषाणूला गांभीर्याने घेतलेलं नाहीय. त्यांच्यावर पुन्हा ते संकट ओढावलं आहे. त्यामुळे आपल्याला आता खूप काळजी घेण्याची गरज आहे. मास्क नियमित वापरायला हवा. या संकटाशी सामना करण्यासाठी आम्ही विज्ञान आणि तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. दरम्यान जे दोन नवे रुग्ण सापडले आहेत, त्यांची वैयक्तिक माहिती आम्ही देऊ शकत नाही.


शेअर करा