अजबच..सेवानिवृत्त होण्याआधी अवघ्या ४५ मिनिटांसाठी बढती मिळाली अन त्यानंतर ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक वेगळीच घटना समोर आलेली असून एका कनिष्ठ अभियंत्यांला फक्त 45 मिनिटासाठी बढती देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्यात समोर आला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एकूणच कारभाराबाबत ओरड पाहायला मिळते . सार्वजनिक बांधकाम खात्यात बढत्यांसाठी बरीच प्रतीक्षा देखील करावी लागते. राज्यातील 588 कनिष्ठ अभियंत्यांच्या बढत्या वर्षभरापासून प्रलंबित आहेत.

दिगंबर पाटील या कनिष्ठ अभियंत्यांना 30 नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी या पदावर बढती देण्यात आली आणि त्यानंतर कोकण विभाग एक इथे असलेल्या जव्हार जिल्हा पालघर येथे नियुक्त करण्यात आले. आदेश उशिरा मिळाल्याने पाटील हे धावत पळत जव्हार इथे संध्याकाळी चार वाजून 45 मिनिटांनी पोहोचले आणि कार्यभार स्वीकारला त्यानंतर पाच वाजून 30 मिनिटांनी ते सेवानिवृत्त देखील झाले. एवढ्या कमी वेळेसाठी बढती मिळालेली राज्यातील एकमेवच अधिकारी असावेत.

एका पोलीस निरीक्षकाची बढती देखील अशाच प्रकारे अवघ्या एक दिवसासाठी मिळाल्याने ते देखील चांगलेच चर्चेत आले आहेत . विकास रामराव रामगुडे हे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. त्यांना 30 नोव्हेंबर रोजी पोलीस उपअधीक्षक पदावर बढती देऊन मुंबईतच नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले. सकाळी पदोन्नती आणि संध्याकाळी सेवानिवृत्ती असाच एक वेगळा अनुभव विकास पायगुडे यांना आला होता.


शेअर करा