.. अखेर ‘ ती ‘ वादग्रस्त नंबर सिरीज सीरिज मागे , तरुणींना मोठा दिलासा

शेअर करा

दिल्ली येथे दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट मध्ये चक्क सेक्स हा शब्द आल्यामुळे एका तरुणीला मोठा मनस्ताप सहन करावा लागला होता त्यानंतर दिल्ली सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेत ही सिरीज पाठीमागे घेतली आहे.

दिल्लीत दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेटवर एस हे अक्षर असते त्यामुळे एस असेल तर हा नंबर दुचाकीचा आहे हे स्पष्ट होते मात्र त्यानंतर नवीन सुरू झालेल्या सीरिजमध्ये ई- एक्स अशी अक्षरे आली आणि तिन्ही अक्षरे सलग लिहिल्या गेल्यामुळे दुचाकीच्या नंबरप्लेटवर सेक्स शब्द येऊ लागला .

धक्कादायक बाब म्हणजे एका तरुणीच्या स्कुटीवर हा शब्द आल्याने तिला अनेकदा अश्लील शेरेबाजी ऐकावी लागली. त्यानंतर तरुणीने दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार केली आणि हा नंबर बदलण्याची मागणी केली. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालीवाल यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेऊन परिवहन विभागाला या सिरीजचे नंबर देणे त्वरित थांबवण्याची निर्देश दिले त्यानंतर दिल्ली सरकारने हे शब्द असलेली वाहन क्रमांकाची सिरीयल मागे घेतली आहे.


शेअर करा