पुणे हादरले..डिलिव्हरी बॉयचे तरुणीच्या समोरच ‘ आक्षेपार्ह ‘ कृत्य अन म्हणाला की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असताना अशीच एक घटना पुणे शहरानजीक उंड्री इथे उघडकीस आली असून चक्क लॅपटॉप बॅग देण्यासाठी आलेल्या एका डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या समोरच पॅटची चैन उघडून आक्षेपार्ह असा प्रकार केल्याने तरुणीला धक्काच बसला आणि उंड्री इथे राहणाऱ्या २३ वर्षाच्या तरुणीने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. सतिश केंधले (रोमान्ना फॅशन्स इंडिया कंपनीचा डिलिव्हरी बॉय) असे आरोपीचे नाव असून त्याच्यावर कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार , फिर्यादी तरुणीने एक्से पॅरिस ब्रॅड व्हाया रोमान्ना फॅशन्स इंडिया या कंपनीची लॅपटॉप बॅग ऑर्डर केली होती. या लॅपटॉप बॅगची डिलिव्हरी करण्यासाठी १ डिसेंबर रोजी रात्री पावणेदहा वाजता कंपनीचा डिलिव्हरी बॉय सतीश केंधले आला आणि आल्यानंतर त्याने घरात 23 वर्षीय तरुणीला पाहून आपल्या पॅटची चैन उघडून लज्जास्पद कृत्य केले.

आपल्यासमोर झालेला हा धक्कादायक प्रकार पाहून तरुणी घाबरून गेली मात्र सदर तरुण देखील तेथून पळून गेला. तरुणीने हा प्रकार तिच्या आईच्या कानी घातला आणि आईने त्याला फोन करून विचारले असताना त्याने ‘ आम्ही कोणालाही घाबरत नाही, काय करायचे ते करा ‘ असे बोलून फिर्यादीच्या आईला देखील धमकी दिली. फिर्यादी यांनी आधी त्याची कंपनीकडे तक्रार केली आणि त्यानंतर प्रकरण पोलिसात गेले असून सहायक पोलीस निरीक्षक दगडे तपास करीत आहेत.


शेअर करा