‘ आज तुझा माजच उतरवणार आहे ‘ , पुण्यात वाहतूक पोलिसाने फोडली शिवनेरी बसची काच : पहा व्हिडीओ

शेअर करा

पुणे शहरात वाहतूक पोलिसांची दादागिरी पुन्हा एकदा चर्चेत आली असून एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून एका वाहतूक पोलिसाने चक्क शिवनेरीच्या चालकाला आई बहिणीवरून शिव्या दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . पोलिसांना किरकोळ कारणावरून चालकाला देखील शिविगाळ करण्याचा अधिकार कोणी दिला आहे का ? सदर व्हिडिओत वाहतूक पोलिसाने शिवीगाळ तर केलीच वरून गाडीची काच देखील फोडली. वाहतूक पोलीस शिस्तीच्या नावाखाली दंगेखोर झाले आहेत का ? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पुणे स्टेशन येथील मालधक्का चौकात शिवनेरी बस वळवताना चालक आणि वाहतूक पोलिसांमध्ये हा वाद सुरु झाला. पोलीस चालकाला आई बहिणीवर शिव्या देत त्याच्यावर अरेरावी करत आहेत. वाहतूक पोलिसांनी चालकासोबत वाद सुरु असतानाच बसची काच देखील फोडली. बस चालकाने याप्रकरणी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार दिली असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/shiva_shivraj/status/1468141880927920132

शिवनेरी बसवरील चालक बाळकृष्ण फुलसुंदर यांनी म्हटले आहे की, ‘ सोमवारी संध्याकाळी ६ ते ६.३० च्या दरम्यान पुणे स्टेशन एसटी आगार येथून दादर शिवनेरी बस क्रमांक MH01 CV 7712 ही मालधक्का चौकाकडे घेऊन जात होतो. त्यावेळी तेथील चौकातील वाहतूक पोलीस कर्मचार्‍याला अनेक वेळा विनंती केली की, गाडी थोडी वळवून घेऊ द्या. पण ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मी गाडी वळवून घेत असताना त्यांनी गाडीचा वायपर तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर काचेवर दगड मारला आहे यामुळे बसच मोठं नुकसान झालं. मी बंडगार्डन पोलिसांकडे तक्रार केली आहे .

बंडगार्डन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक तुकाराम फड यांना या घटनेबाबत विचारले असता ते म्हणाले की, ‘ मालधक्का चौकात शिवनेरी बसच्या नुकसानीबाबत आमच्याकडे तक्रार आली असून त्याबाबत चौकशी सुरू आहे. घटनेचा तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. ‘ तर दुसरीकडे सदर व्हिडीओवर याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असून या दंगेखोर पोलीसांवर कारवाई करावी अशी मागणी नेटिझन्स करत आहेत.


शेअर करा