सर्वात मोठी बातमी..सीडीएस बिपीन रावत यांच्या हेलीकॉप्टरचा अपघात, चार जणांचा मृत्यू

शेअर करा

एक अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली असून चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत हे ज्या हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करत होते त्याचा अपघात झाला असून सदर दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत. तमिळनाडू येथील कुन्नूर भागात ही दुर्घटना घडलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपीन रावत, त्यांचे कुटुंबीय आणि अधिकारी प्रवास करत होते. आगीवर नियंत्रण मिळवणयाचा प्रयत्न सुरु असून यात चार जण दगावल्याची माहिती समोर येत आहे मात्र अद्याप मृतदेहांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.

भारतीय हवाई दलानेही ट्विट करत या घटनेबद्दल माहिती दिली आहे. या हेलिकॉप्टरने बिपीन रावतही प्रवास करत असल्याचं यात सांगण्यात आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवासी करत होते. यामध्ये बिपीन रावत, बिपीन रावत यांच्या पत्नी, लष्कराचे काही अधिकारी तसेच इतर सुरक्षारक्षक, कमांडोज उपस्थित होते.

हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण होते. रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नी देखील होत्या असं सांगितलं जात आहे. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरुन 4 मृतदेह काढले असून 3 जखमींना बाहेर काढण्यात आलं आहे.

स्थानिक सैन्य अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून स्थानिकांनी 80 टक्के भाजलेल्या दोन व्यक्तींचे देह रुग्णालयात पोहोचवल्याचे सांगण्याच येत आहे. काही देह पर्वताच्या उतारावर पडल्याचे दिसून येत आहेत आणि त्यांना बाहेर काढण्याचे व ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असं वायूसेनेने स्पष्ट केलं आहे.


शेअर करा