निव्वळ कुतूहल म्हणून पुण्याच्या बुधवार पेठेत आलेल्या गृहस्थाला ‘ झप्पी ‘ अनुभव मात्र त्यानंतर..

शेअर करा

प्रत्येक शहरात कुठे का कुठे रेड लाईट एरिया हा आढळून येतो. दुर्दैवाने हा प्रकार थांबवण्यात अद्याप देखील सरकारी यंत्रणेला यश आले नाही . स्थानिक नागरिक देखील केवळ तक्रार देण्यापलीकडे काही करू शकत नाही आणि हा प्रकार असाच राज्यात सुरु आहे . बाहेरून शहरात आलेल्या लोकांना परिसराचे नाव माहित असते मात्र इतर काही माहिती नसते . केवळ कुतूहल म्हणून काही महाभाग अशा ठिकाणी जातात आणि स्वतःची फसवणूक करून घेतात . असाच प्रकार पुणे येथील बुधवार पेठ परिसरातील नागरिकांसोबत घडलेला असून सदर प्रकाराची परिसरात ‘ खमंग ‘ चर्चा रंगलेली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धानोरा येथील फिर्यादी काही दिवसांपूर्वी पुणे इथे आलेले असताना सहज म्हणून पुण्यातील बुधवार पेठ येथील दाणी आळीमधून फेरफटका मारत पायी जात होते त्यावेळी नवी बिल्डिंगसमोर ते आले असताना आरोपी फिर्यादीच्या जवळ आले आणि त्यांनी ‘ गावाकडून आला आहे काय ?, असे म्हणून त्यांचा हात पकडला आणि जबरदस्तीने मिठी मारुन फिर्यादीच्या पँटच्या खिशातील पाकीट व त्यामध्ये असलेले २६ हजार रुपये चोरुन नेले.

आपल्यासोबत घडलेल्या या अचानक प्रकारची फिर्यादींना कल्पनाच नव्हती आणि त्यांनी मिठी मारल्यानंतर खिसे तपासले असताना पाकीट गायब झाल्याचे समजले. चार व्यक्तींनी आपल्यासोबत असा प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे असून त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे . पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत. नवीन नवीन म्हणून आलेल्या तरुणांसोबत असे प्रकार याआधी घडत होते मात्र आता या चोरांनी वयाची अट देखील पार केल्याचे या घटनेवरून दिसून आले आहे .


शेअर करा