नगर ब्रेकिंग..व्यावसायिक गाडीतून उतरताच दोन जणांनी साधला डाव अन

शेअर करा

नगर शहरातील पोलीस सध्या कोरोना प्रतिबंध नियमावली आणि दंड वसुलीसाठी प्रयत्नशील असताना दुसरीकडे गुन्हेगारीचे प्रमाण मात्र शहरात वाढत चाललेले आहे. नगर शहरात चोरी आणि लुटमारीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असून मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास शहरातील औरंगाबाद रोडवरील वसंत टेकडी अर्बन बँक कॉलनी येथे दोन चोरट्यांनी अक्षरशः व्यावसायिकाला धमकावत व्यवसायिकाची ब्रिजा कार पळवली. कारमध्ये साडेतीन लाखांची रोख रक्कम देखील होती.

मयुर विजय कुमार गांधी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून दोन चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधी हे मंगळवारी रात्री त्यांच्या बंगल्यासमोर कार घेऊन आले. बंगल्याचे गेट उघडण्यासाठी ते कारमधून उतरले असताना पुन्हा ते गाडीत बसताना दबा धरून बसलेल्या चोरट्यांनी त्यांना ढकलून देत त्यांची कार पळवून नेली. कारमध्ये साडेतीन लाख रुपये होते. सदर प्रकरणाचा सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर हे तपास करत आहेत


शेअर करा