नगर हादरले..’ ती ‘ सहा महिन्यांची गरोदर असतानाही नको ते घडलं

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक अशीच एक घटना नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात घडलेली आहे. सदर घटनेमध्ये आरोपीने एका गरोदर महिलेला पिण्याचे पाणी मागितले आणि ती घरात शिरली असता त्याने आतून घराचा दरवाजा लावून घेतला आणि तिच्यावर अत्याचार केला.

उपलब्ध माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे 9 डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आरोपी एका महिलेच्या घरी गेला आणि तिला पिण्यासाठी म्हणून पाणी मागितले. महिला पाणी देण्यासाठी आत गेले असता आरोपी तिच्या पाठीमागे गेला आणि त्याने घराच्या दरवाजाला आतून कडी लावली. महिलेने त्याला आपण सहा महिन्यांची गरोदर असल्याचे सांगितले मात्र आरोपीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला.

विकास अंकुश ढोले ( राहणार वंजारवाडी ) असे या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेच्या वेळी त्याने या महिलेसोबत केलेल्या शरीरसंबंधाचा व्हिडिओ देखील बनवला आणि हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला गप्प राहण्यास सांगितले मात्र महिलेने सदर घटना आपल्या कुटुंबीयांकडे सांगितली आणि त्यानंतर आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला.


शेअर करा