पुणे हादरले..हनी ट्रॅप खंडणीला सोकावलेली तरुणी आईसह पैसे घ्यायला आली अन..

शेअर करा

चित्र : सांकेतिक

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे. जिल्हा पशुसंवर्धन कार्यालयातील अधिकाऱ्याला विनयभंगाची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी ब्लॅकमेल करणाऱ्या एका आईला तिच्या मुलीसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कॅम्प परिसरातील एका हॉटेलमध्ये खंडणीची रक्कम घेण्यासाठी त्या आल्या असताना ही कारवाई करण्यात आली आहे .

उपलब्ध माहितीनुसार, तक्रारदार ( वय ५६ ) पशुसंवर्धन विभागात अधिकारी पदावर कार्यरत असून दीड महिन्यापूर्वी त्यांच्या कार्यालयात आरोपी तरुणी ( वय २५ ) कंत्राटी पद्धतीने कामासाठी लागली होती. काम करत असताना फिर्यादी यांनी आपला हात धरला आणि आपला विनयभंग केला असे तिचे म्हणणे असून अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी ती सातत्याने देत होती.

गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाख द्या तर मी गुन्हा दाखल करणार नाही, असे देखील तिने या अधिकाऱ्याला धमकावले होते. धक्कादायक बाब म्हणजे तिचे आई वडील आणि एक मित्रदेखील ( वय ५२ वर्षे ) पैसे उकळण्यासाठी तिला प्रोत्साहन देत होते . वारंवार सदर अधिकाऱ्याने तिला असे काही करू नये याबद्दल विनंती केली होती मात्र तिने पैशासाठी या अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करणे सुरु केले.

सातत्याने तरुणीच्या या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने पोलीस दलात याची तक्रार केली आणि गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना रंगेहाथ पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला. एसजीएस मॉल परिसरात खंडणीची रक्कम घेण्यासाठी पोलिसांनी फिर्यादीच्या मदतीने आरोपींना बोलावले.

एका कॉफी शॉप मध्ये दोन लाख रुपयांची खंडणी घेताना मुलीला आणि तिच्या आईला रंगेहाथ पकडले. सदर तरुणीला अन आईला रंगेहाथ धरल्याचे समजताच तिचा मित्र आणि तरुणीचे वडील मात्र फरार झाले आहेत . 56 वर्षीय हतबल झालेल्या या अधिकाऱ्याने याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.


शेअर करा