नगर हादरले..महिला बाथरूमध्ये आंघोळ करत असताना दरवाज्याजवळ चक्क ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर शहरात उघडकीस आली असून बाथरूममध्ये अंघोळ करणाऱ्या महिलेचे मोबाईल मध्ये चित्रीकरण करणाऱ्या आरोपीच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मतीन हुसेन शेख ( राहणार आंबेडकर चौक झेंडीगेट ) असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात विनयभंग ॲट्रॉसिटी आधी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

उपलब्ध माहितीनुसार, पीडित महिला ही तिच्या राहत्या घराच्या बाजूला एका बाथरुममध्ये अंघोळ करत होती त्यावेळी आरोपीने त्याच्या मोबाईलमध्ये बाथरूमच्या दरवाज्याच्या मोकळ्या जागेतून चित्रीकरण केले. सदर घटना महिलेने पाहिली असता आरोपी गडबडून गेला आणि त्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशातून मोबाईल फोडून टाकला तसेच महिलेला देखील शिवीगाळ केली.

पीडित महिलेने यानंतर शनिवारी सकाळी पोलीस ठाण्यात धाव घेत झेंडीगेट येथील या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. युवकाच्या या कृतीनंतर महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आरोपी युवकाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी नागरिक करत आहेत.


शेअर करा