‘ मला फक्त 50 कोटी द्या, मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो ‘, सुरेशअण्णा धस यांचे जाहीर आव्हान

शेअर करा

एक हजार कोटींच्या देवस्थान जमीन घोटाळ्याच्या आरोपावर भाजप आमदार सुरेश धस यांनी अखेर पाटोदा इथे आयोजित जाहीर सभेत मौन सोडले असून , ‘ तुमचं सरकार आहे चौकशी करा, ढगात गोळ्या मारू नका. 1 हजार कोटीचा आरोप करणाऱ्यांना माझ्याकडील, माझी वडिलोपार्जित व मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी, मी त्यांच्या नावावर करतो. मला फक्त 50 कोटी द्या. मी घरदार सगळं सोडून जिल्हा सोडतो, असे आव्हान सुरेश धस यांनी तक्रारदारांना केलं आहे.

राष्ट्रवादीचे आरटीआय कार्यकर्ते राम खाडे आणि अॅड असीम सरोदे यांनी औरंगाबाद येथे पत्रकार परिषद घेऊन आष्टी तालुक्यातील देवस्थान आणि इनामी जमीनीमधील 200 हेक्टर जमीन बनावट दस्तऐवज करून सुरेश धस यांनी बळकावल्याचा आरोप केला होता त्यावर आमदार सुरेश धस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे .

सुरेश धस म्हणाले, ‘ ज्यांनी ईडीकडे तक्रार केली त्यांना माझं म्हणणं आहे की माझ्याकडे 1 हजार कोटीची जमीन संपत्ती आहे. त्याना माझं चॅलेंज आहे फक्त 50 कोटी द्या. मी माझी वडिलोपार्जित सगळी प्रॉपर्टी घर दार तुमच्या नावावर करून जिल्हा सोडून जातो. टीका टिपण्ण्या करताना उगाच दुसऱ्याच्या इज्जती घ्यायच्या.उगाच ढगात गोळ्या सोडू नका.’


शेअर करा