‘ मनपाचा खुला भूखंड अधिकाऱ्यांनी चक्क विकला ‘, नगरसेवक कुमार वाकळे यांचा आरोप

शेअर करा

नगर महापालिकेतील भोंगळ कारभार नागरिकांना चांगलाच परिचयाचा असून ‘ बोल्हेगाव प्रभाग क्रमांक सात मधील साईराज उपनगरातील महापालिकेच्या 44 गुंठ्याचा भूखंड सुधारित आराखडा तयार करून अधिकाऱ्यांनी भूखंड विकला आहे ‘ असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार वाकळे यांनी सोमवारी केला आहे. नगरसेवक कुमार वाकळे यांनी परिसरातील नागरिकांसह महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.

आयुक्त यांना बद्दल एक निवेदन देण्यात आले असून त्यात म्हटले आहे की, ‘ महापालिकेचा खुला भूखंड असताना अधिकार्‍यांनी बांधकाम व्यावसायिकाशी हातमिळवणी करून सुधारित आराखडा तयार करून दिला. यात अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून या खुल्या जागेत मनपाने सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. सदर ठिकाणी सांस्कृतिक भवन उभे आहे असे असताना हा भूखंड अनधिकृत कसा झाला ? या जागेत पंधरा वर्षांपूर्वी दत्त मंदिर, श्री भगवान बाबा मंदिर, श्री संत वामन बाबा मंदिर, गणेश मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, संतराम नागरगोजे सांस्कृतिक भवन उभे आहेमात्र काही बांधकाम व्यावसायिक हे नागरिकांना धमकावत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक देखील संतप्त झालेले असून या भागातील मंदिराच्या आणि सांस्कृतिक भवनाच्या एकाही विटेला हात लावून देणार नाही ‘ असा इशारा देखील या निवेदनाद्वारे देण्यात आलेला आहे.

नगरसेवक कुमार वाकळे यांच्यासोबत यावेळी भीमसेन कोणते, शेषराव बडे , मोहन पडोळे, गोरख खाडे, गहिनीनाथ बडे, मुरलीधर सुळे, ज्ञानदेव जायभाय, नंदाताई आंधळे, सविता अडसूळ, अनिता सोनवणे, संध्या दिवटे यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

नगर महापालिका अधिकाऱ्यांचे असे अनेक कारनामे नगर शहरात या आधी देखील उघडकीस आलेले आहेत मात्र त्यांच्यावर कित्येक निवेदने देऊनही कुठलीही कारवाई आत्तापर्यंत झालेली नसल्याने अधिकारी आणि त्यांच्या हाताखालील कर्मचारी यांना कुणाचेही भय राहिलेले नाही त्यामुळे नगर शहरातील प्रत्येक भूखंडाचे मनमानी पद्धतीने वर्गीकरण करणे आणि मर्जीतल्या बांधकाम व्यवसायिकांना फेवर करणे असे प्रकार सातत्याने घडत आहेत . आयुक्त यांनी या प्रकरणी गंभीरपणे लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करत आहेत.


शेअर करा