नागपूर हादरले..विवाहित महिला चक्क फेसबुक फ्रेंडकडून गर्भवती , प्रियकर म्हणतोय की ..

शेअर करा

महाराष्ट्रात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून फेसबुकवर एका तरुणाच्या संपर्कात आल्यावर विवाहित महिला अक्षरश: त्याच्यासाठी वेडी झाली अन तिने तिच्या नादात प्रेमाच्या साऱ्या मर्यादा पार केल्या . सदर तरुणाने देखील ती राहत असलेल्या नागपूर शहरात येऊन तिचा पती नसताना तिच्यासोबत अनेक वेळा संबंध ठेवले आणि त्यातून तिला दिवस गेले. अनेक वेळा तिचा गर्भपात देखील केला मात्र लग्नाची वेळ येताच त्याने नकार दिल्याने महिलेला त्या क्षणाला फसवले गेल्याची जाणीव झाली आणि तिने या तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला. देवेंद्र विकास पवार (३८, रा. चांदसार, जि. जळगाव) असे आरोपीचे नाव असल्याचे समजते .

उपलब्ध माहितीनुसार , महिलेचे वय हे ३६ वर्षे असून तिचे १८ व्या वर्षी लग्न झाले होते मात्र पतीसोबत पटत नसल्याने ती मुलांना घेऊन वेगळी राहते. ती खाजगी दवाखान्यात परिचारिका म्हणून कार्यरत आहे तर तिचा पती हा खाजगी वाहनचालक आहे . महिलेला पहिल्या पतीपासून एक मुलगा आणि अन मुलगी देखील आहे . संसारसुख नसल्याने सदर महिला ही फेसबुकवर जास्तच सक्रिय होती आणि अशातच तिची ओळख जळगाव येथील देवेंद्र पवार याच्याशी झाली.

सुरुवातीला काही दिवस ते फक्त फेसबुक फ्रेंडच होते मात्र हळूहळू त्यांची मैत्री बहरत गेली आणि त्यांनी एकमेकांचे नंबर देखील शेअर केले आणि फोनवर देखील एकमेकांसोबत रात्रंदिवस बोलू लागले. काही कालावधी गेल्यावर देवेंद्रने तिला भेटण्यासाठी जळगाव इथे बोलावले. पीडित महिला ही देवेंद्रला भेटण्यासाठी जळगावला गेली असताना देवेंद्रने तिला मित्राच्या घरी नेऊन लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

पीडित महिला ही आधीपासूनच पतीपासून वेगळी राहत असल्याने ती पतीला घटस्फोट देऊन देवेंद्रसोबत लग्न करणार होती. काही कालावधी गेल्यावर देवेंद्र हाच नागपूरला आला आणि शताब्दी चौकात भाड्याने खोली घेऊन ते पती-पत्नीप्रमाणे राहत होते. २०१९ मध्ये महिला ही जरीपटका हद्दीत कुशीनगर येथे रहायला गेली तेथेही वेळोवेळी जाऊन देवेंद्र याने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

आपण लग्न करणार आहोत असे सांगत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवत होता आणि महिलेला देखील आज नाही तर उद्या आपले लग्न होणारच आहे अशा भावनेने त्याच्या हेतूबद्दल काही शंका आली नाही . सातत्याने असा प्रकार होऊ लागल्याने महिला देवेंद्रपासून गर्भवती झाली त्यावेळी महिलेचा विरोध असताना देखील त्याने बळजबरीने तिचा गर्भपात करून घेतला आणि लग्नाला नकार दिला. त्याच वेळी महिलेला फसवले गेल्याची जाणीव झाली आणि तिने पोलीस ठाण्यात धाव घेतली. जरीपटका पोलिसांनी आरोपी देवेंद्र याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे .


शेअर करा