पुणे हादरले..एकाच दोरीने गळफास घेण्याचा प्रियकर प्रेयसीचा प्रयत्न , नागरिकांनी पाहिले तेव्हा ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली असून पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात मोहितेवाडी इथे एका शेतात झाडाला गळफास घेऊन प्रेयसी आणि प्रियकराने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला दुर्दैवाने या घटनेत या प्रेयसीचा मृत्यू झाला आहे तर प्रियकर बेशुद्धावस्थेत खाली पडलेला नागरिकांना आढळून आला. नागरिकांनी तात्काळ त्याला पिंपरी चिंचवड येथील एका रुग्णालयात दाखल केले.

उपलब्ध माहितीनुसार , सुषमा दिनकर सोनवणे (वय २२, रा. जांभोळशी, पो. मांढवे, ता. जुन्नर) असे मयत पावलेल्या प्रेयसीचे नाव असून हरिदास कुंडलिक देवचे (वय २८, रा. जांभोळशी) असे तिच्या प्रियकराचे नाव आहे . तो सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे . परिसरात ही घटना उघडकीस आल्यावर चांगलीच खळबळ उडाली होती. सोमवारी दि.२० तारखेला ही घटना उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. सुषमा ही शिक्रापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती, तर हरिदास हा चाकण औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत खासगी नोकरीस होता. आत्महत्येच्या प्रयत्नात सुषमा हिचा जागीच मृत्यू झाला होता, तर हरिदास हा बेशुद्धावस्थेत होता. दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतला होता मात्र दुर्दैवाने त्यात प्रेयसीचा मृत्यू झाला.

सध्या प्रियकर हरिदासवर पिंपरी चिंचवड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा व हरिदास या दोघांचे प्रेमसंबंध होते. त्यातील काही कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे


शेअर करा