पुणे हादरले..पोलिसांनी सहज हटकलेल्या तरुणाच्या मोबाईलमध्ये ‘ असले कारनामे ‘ उघडकीस की ..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना पुणे इथे उघडकीस आली आहे . पुण्यातील तळजाई पठार परिसरात एका युवकाला संशयास्पद परिस्थितीत पोलिसांनी अटक केली असताना त्याचा मोबाईल उघडून पाहिले असताना त्यात चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झालेले पाहून पोलिसही हादरून गेले. सदर मोबाईल क्लिपचा वापर करून हा आरोपी व त्याचे मित्र या मुलावर धमकी देत अनेकदा अत्याचार करत होते .

उपलब्ध माहितीनुसार , ईश्वर शिंदे (वय 20), कुणाल भांगरे (वय 19) आणि निलेश नेटके (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात हा गुन्हा घडल्याने हवेली पोलीस स्टेशनकडे सदर गुन्हा पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपीच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले होते मात्र एका मोठ्या गुन्ह्याची उकल यातून पोलिसांना झाली आहे .

सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर शिंदे हा तळजाई पठार परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोबाईल घेऊन तो तपासला असता त्याच्या मोबाईलमध्ये दोन व्यक्ती एका अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार करत असल्याची क्लिप आढळून आली होती. सदर क्लिप त्यानेच रेकॉर्ड केल्याचे सांगितले असून सहकारनगर पोलिसांनी व्हिडिओमधील या पीडित मुलाचा शोध घेतला आहे . मुलाच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून लैंगिक अत्याचार करणाऱ्या इतर दोन्ही आरोपींना देखील बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत.

आरोपींनी यावर्षी दिवाळीच्या कालावधीत या अल्पवयीन मुलासोबत लैंगिक अत्याचार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहसीन पठाण, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे आणि इतर कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली असून पोलिसांच्या जागरूकतेमुळे एका विकृत टोळीचा पर्दाफाश झाला आहे .


शेअर करा