नात्याला काळिमा..अंत्यविधीच्या कार्यक्रमाला आलेल्या सासूवर जावयाचा बलात्कार

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना अमरावती इथे उघडकीस आली आहे .विष पाजण्याची धमकी देत जावयाने सासूवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना अमरावती इथे उघडकीस आली असून सर्व थरातून ह्या घटनेबद्दल संताप व्यक्त केला जात आहे . धक्कादायक बाब म्हणजे ही महिला तिच्या वडिलांचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीनंतरच्या कार्यक्रमाला वाशीम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातून नाशिकमध्ये आली होती.

उपलब्ध माहितीनुसार ,संशयित नितीन आशू वाणी (वय ३५, रा. भारतनगर, मूळ वाशिम) याने पीडित महिलेला आपल्या घरी बोलावून घेत साडीचोळी करण्याचा बनाव केला म्हणून ही महिला मुक्कामाला थांबलेली असताना मध्यरात्रीच्या सुमारास संशयित नितीन याने नात्याने मावस सासू लागणाऱ्या पीडितेचा झोपेत गळा दाबला आणि तिला विषाची बाटली दाखवून दमदाटी करत तिच्यावर बलात्कार केला , असे पीडित महिलेचे म्हणणे आहे .

एवढे करूनही आरोपीचे समाधान झाले नसल्याने त्याने सदर प्रकार मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला आणि पुन्हा १ ऑक्टोबर रोजी पीडितेला तिची अश्लील छायाचित्रे मोबाइलवर दाखवून ब्लॅकमेल सुरु केले आणि एका लॉजवर भेटायला बोलावले. पीडित महिला तिथे पोहचली असताना त्याने लॉजवर देखील तिच्यावर अत्याचार केला. सदर प्रकार कुणाला सांगशील तर जीव मारण्याची देखील धमकी आरोपीने दिली.

त्याच्या या धमकीला घाबरून महिला शांत बसली मात्र संशयित आरोपी पुन्हा १० नोव्हेंबर रोजी महिला राहत असलेल्या अमरावती येथील घरी आला आणि तिथे देखील तिच्यावर अत्याचार केला आणि तिला कुटुंबियांसह जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पीडित महिलेला त्याचा त्रास होऊ लागला आणि तिने अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात धाव घेत घडलेला प्रकार सांगितला . पोलिसांनी तपास सुरु केला असून गुन्हा नाशिक आणि अमरावती जिल्ह्यात घडलेला असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरु असल्याचे समजते.


शेअर करा