दारूचे पेग रिचूवन हिंमत आल्यावर बंटी बबली करायचे ‘ हे ‘ काम मात्र पोलिसांनी रंगेहाथ धरले : कुठे घडली घटना ?

शेअर करा

महाराष्ट्रात नुकतीच पोलिसांनी एका बंटी बबलीच्या जोडीस अटक केली आहे . दिसायला गोरीपान आणि छान छान कपडे घातलेली बॉयकटमधील ती पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाडयांना मास्टर की लावून गाड्या चोरायची आणि त्याचवेळी तिचा सहकारी सामाजिक कार्यकर्ता पाळत ठेवायचा. गाडी चोरली की कवडीमोल भावाने त्यांची विक्री करायची .अशा पद्धतीने चोरीची साखळी चालवणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेरच्या महिला चोरासह तिच्या मित्राला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. गेल्या काही वर्षात असंख्य गाड्यांची त्यांनी विक्री केली असून आता त्यांच्याकडून २५ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहेत .

उपलब्ध माहितीनुसार, हेमलता देविदास पाटील (वय ३५,रा.खड्डाजीन अमळनेर) असे ह्या महिलेचे नाव असून तिच्या सहकाऱ्याचे नाव निवृत्ती सुकलाला माळी ऊर्फ छोटू (वय-४८,रा.माळीवाडा अमळनेर ) असे आहे . निवृत्ती सुकलाला माळी हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. सहा वर्षांपूर्वी हेमलता ही समलिंगी प्रकरणात न्यायालयात आली होती तेव्हा या दोघांची ओळख झाली. छोटू हा त्यावेळी एका स्टॅन्ड व्हेंडरकडे कामास होता . हळू हळू या दोघांची ओळख होऊन ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी हा चोरीचा व्यवसाय निवडला.

गाड्या चोरण्यासाठी त्यांचे प्रथम लक्ष होते शासकीय कार्यालये आणि मार्केट कारण या ठिकाणी गर्दी कायमच असते शिवाय लक्ष ठेवणारे देखील जास्त कोणी नाही . त्यांना या व्यवसायात बक्कळ पैसे मिळू लागला आणि चोरलेली गाडी स्टॅम्प पेपरवर खरेदीदारांची सही घेतली की आपली जबाबदारी संपली, अशा पद्धतीने त्यांना ग्राहक देखील भरपूर मिळू लागले. लाखाची गाडी केवळ १०-२० हजारात मिळत असल्याने त्यांची प्रसिद्धी आपोआप होत गेली आणि गुन्हेशाखेच्या पथकाला याचा सुगावा लागला. निरीक्षक बापू रोहोम यांच्या पथकातील संजय सपकाळे, अशरफ शेख, सुधाकर अंभोरे अशांनी सलग तीन दिवस पाळत ठेवून चोरीची दुचाकी विक्री करताना बंटी-बबलीच्या जोडीला रंगेहाथ अटक केली.

शासकीय कार्यालयात कायम उपस्थिती असल्याने छोटू ऊर्फ निवृत्ती सुकलाल माळी हा अमळनेर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. तहसील कचेरी, पेालीस ठाणे, न्यायालयातील अर्जफाटे आणि तक्रारींसाठी तो काही ग्रामस्थांना मदत करीत असल्याने त्याच्यावर कोणाचा संशय देखील येत नव्हता. साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर गाडीनंबरसह तो हमीपत्र लिहून देत सत्तर हजारांचे वाहन १० ते १५ हजारांना विकून तो आणि हेमलता निश्‍चीत होत असत. मात्र आता हा व्यवसायच पोलिसांनी उध्वस्त केला असून त्यांच्याकडून ज्यांनी वाहने घेतली आहेत त्यांना देखील संशयित आरोपी करणार असल्याचे संकेत पोलिसांकडून देण्यात आले आहेत .

चोरी करताना हिम्मत लागते . कोणी अचानक आले तर वेळ मारून न्यावी लागते त्यासाठी खोटे बोलण्यासाठी डेरिंग हवी म्हणून चोरीपूर्वी हे दोघेही दारू पीत असत..दिसायला गोरीपान व बाय कट करून शर्ट-पँट घातलेली ही महिला चोर वाहनाजवळ जाऊन बनावट चावीने गाडीचे लॉक काढत असे . हॅन्डल लॉक काढले की थोडी मेहनत करून गाडी सुरु करून अमळनेरला फरार होत असत. आतापर्यंत यांच्याकडून २५ दुचाक्या हस्तगत करण्यात आल्या असून आणखीन ह्या रॅकेटचे धागेदोरे कुठवर पोहचले आहेत यासाठी पोलिसांचा तपास सुरु आहे .


शेअर करा