रात्री लैंगिक संबंध ठेवताच दुसऱ्या दिवशी पत्नी गरोदर , रिपोर्टमध्ये समोर आले भयानक

शेअर करा

सोशल मीडियात कधी कोणती बातमी व्हायरल होईल याचा काही नेम राहिलेला नाही. एक महिला लैंगिक संबंध ठेवताच लगेच दुसऱ्या दिवशी गरोदर व्हायची. हा विचित्र प्रकार इंग्लंडमधील एका महिलेसोबत घडत होता. पतीसोबत रात्री लैंगिक संबंध ठेवायची अन् सकाळी तिला पोटात तीव्र वेदना जाणवायच्या आणि चक्क तिचं पोट हे ९ महिने गरोदर असलेल्या महिलेइतकं मोठं व्हायचं. डॉक्टरांशी संपर्क केल्यानंतर रिपोर्टमध्ये जे समोर आलं ते पाहून ती देखील हादरून गेली.

इंग्लंडमधील डेव्हॉनमध्ये राहणाऱ्या या महिलेचं नाव केटी सिम्स असं आहे. ही ३२ वर्षीय महिला शरीरात होणाऱ्या बदलांमुळे त्रस्त होती. शारिरीक संबंध ठेवताच दुसऱ्याच दिवशी तिचं पोट वाढायचं त्यामुळे सर्वांनाच ती गरोदर असल्याचा भास होत असे. सेक्शुअल अॅक्टव्हिटीमुळे पोटात वेदना होत असतील असा तिचा समज होता मात्र रिपोर्टमध्ये भलताच प्रकार असल्याचं समोर आलं.

डॉक्टरांनी केटीच्या पोटाचं स्कॅन केलं असता केटीच्या पोटामध्ये १० सेंटीमीटर आकाराची एक गाठ होती. जिचं रुपांतर नंतर कॅन्सरमध्ये होऊ शकलं असतं. जेव्हा केटी पतीसोबत लैंगिक संबंध ठेवायची तेव्हा तिच्या पोटातील गाठीवर ताब पडत असे. अन् त्यामुळे आतड्यांना सुज यायची आणि प्रचंड वेदना जाणवायच्या आणि सूज आल्याने तिचे पोट फुगायचे. शस्त्रक्रिया करून केटीच्या पोटातील गाठ काढण्यात आली. हा अनोखा अनुभव तिने एका टिक-टॉक व्हिडीओद्वारे शेअर केला आहे.


शेअर करा