मोठी बातमी..उच्चभ्रू कुटुंबातील दोन्ही सुना गवंड्यासोबत गेल्या पळून

शेअर करा

प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं असं म्हटलं जातं मात्र कधी कधी याचा चक्क कहर झालेला पाहायला मिळतो. असाच एक प्रकार गुजरात इथे उघडकीस आलेला असून गुजरातच्या एक सुशिक्षित आणि उच्चभ्रू कुटुंबातील दोन्ही सुना चक्क घर रिपेअर करण्यासाठी आलेल्या गवंड्यांसोबत पळून गेल्या आहेत. हतबल परिवाराने पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, गुजरातमधील हालवडा इथे ही घटना उघडकीस आली असून एका घरात रिपेरिंगचं काम सुरु होतं. घर रिपेरिंगच्या कामासाठी आलेल्या गवंडी लोकांच्या जेवणपाणी आणि इतर गोष्टींची जबाबदारी या सुनांवर टाकण्यात आली होती. गप्पांच्या ओघात या महिला गवंडी असलेल्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडल्या आणि योग्य वेळ येताच घरातून फरार झाल्या. दोन्ही सुना घरातून फरार झाल्याने कुटुंबाची चांगलीच नाचक्की झाली.

दोन्हीही सुना घरात नाहीत हा प्रकार पाहून कुटुंबीय त्यांचा इतरत्र शोध घेऊ लागले मात्र तोवर त्या गवंड्यासोबत फरार झाल्या होत्या.पोलिसांनी सर्वप्रथम त्यांच्या मोबाईल कॉलिंगचे रेकॉर्ड्स तपासले त्यावेळी दोन्ही सुना गवंड्यांसोबत पळाल्या असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांचे फोन ट्रेस करण्याचा प्रयत्न केला असता सुरुवातीला त्यांचं लोकेशन मुर्शिदाबाद येथे दाखवत होतं मात्र त्यानंतर ते मुंबईत पळाले असल्याचे वृत्त आहे.

ज्या घरातून सुना पळाल्या ते परिसरातील एक उच्चभ्रू कुटुंब असून पोलिसांनी या सुनांचा शोध घेण्यासाठी एका स्पेशल टीमची स्थापना केली असून पोलिसांची एक स्पेशल टीम आता मुंबईत येऊन त्यांचा तपास करणार आहे. घरातील मोठ्या सुनेसोबतच लहान सूनही आपल्या सहा वर्षाच्या मुलासोबत फरार झाली आहे.


शेअर करा