लग्नानंतर 15 दिवसांतच नववधू प्रियकरासोबत गेली पळून : कुठे घडली घटना ?

शेअर करा

आईवडिलांनी तिचे लग्न लावून दिले मात्र लग्नानंतर फक्त १५ दिवसात तिने प्रियकरासोबत धूम ठोकली. जर मुलीचे बाहेर प्रेमप्रकरण चालू होते तर आमच्या मुलाशी का लग्न लावून दिले असा प्रश्न आता सासरची मंडळी विचारू लागली आहेत . लग्न झाल्यावर फक्त १५ दिवसात नववधू पळून गेल्याची घटना नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे ही घटना घडली आहे. नववधू पुण्यातील बारामती तालुक्यातील असून ज्या पतीची फसवणूक झाली तो नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील रहिवासी आहे. ही विचित्र घटना आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

झालं असं की, श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी येथे राहणाऱ्या एका तरुणाशी बारामती तालुक्यातील एका तरुणीचा 25 जूनला विवाह झाला होता. लॉकडाऊनमुळे मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह पार पडला होता. लग्नानंतर माहेरी पाठवतात त्याप्रमाणे तिला माहेरी पाठवले मात्र ती परत आलीच नाही. माहेरी तिचा प्रियकर तिची वाटच पाहत होता . मुलीचे माहेर आणि तिच्या प्रियकराचे गाव एकच आहे .

लग्न करून जरी ती माहेरी आली होती तरी तिला नवीन संसारात काही रस नव्हता. तिने तिच्या प्रियकरासोबत पळून जाण्याचे ठरवले होते. त्याचप्रमाणे योग्य संधी मिळताच संबंधित तरुणी प्रियकरासोबत आळंदीला पळाली .तिथे जाऊन त्या दोघांनी लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. लग्नापूर्वीच तरुणीचे माहेर असलेल्या बारामती तालुक्यातील तरडोली गावातील तरुणासोबत ह्या तरुणीचे प्रेमसंबंध होते. तरुणी गेली तर गेली मात्र जाताना सुमारे दीड लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने देखील घेऊन गायब झाली.

११ जुलैला ती प्रियकरासोबत निघून गेली आणि १७ जुलैला तिने प्रियकरासोबत दुसरे लग्न देखील केले. मात्र ह्या प्रकरणानंतर मुलाच्या कुटुंबीयांची चांगलीच फसवणूक झाली असून पतीने ह्या नववधूच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे .पतीने दिलेल्या तक्रारीवरुन पत्नी आणि तिच्या प्रियकराविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


शेअर करा