नगर ब्रेकिंग..23 डिसेंबरच्या रात्री नक्की काय घडलं ? तरुणी म्हणतेय की..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असताना अशीच एक घटना नगर येथे उघडकीस आली असून उच्च शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीला विवाहित तरुणीला आत्महत्येची धमकी देत जम्मूसह विविध ठिकाणी फिरायला नेले आणि त्यानंतर नगर तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये नेऊन आरोपीने तिच्यावर अत्याचार केले.

पीडित तरुणीने नगर एमआयडीसी पोलीस ठाण्यात शनिवारी 25 तारखेला दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी बापू बाबासाहेब मुटे ( राहणार भिंगार ) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेली आहे.

उपलब्ध माहितीनुसार आरोपी बापू याने सदर तरुणीला ‘ माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू जर नकार दिला तर मी आत्महत्या करेन ‘ अशी धमकी देत तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर तिला जम्मू पुणे कटरा या ठिकाणी फिरायला नेले. त्यानंतर 23 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता तो सदर तरुणीला नगर तालुक्यातील देवगाव येथील देवदरी रिसॉर्टमध्ये घेऊन गेला आणि तरुणीसोबत जबरदस्तीने त्यांनी शारीरिक संबंध ठेवले.

पीडित तरुणीला तो लग्नाचे आश्वासन देत होता, सोबतच माझे जरी लग्न झालेले असले तरी मी पहिल्या बायकोला फारकत घेऊन तुझ्या सोबत लग्न करीन असे त्याने तिला आमिष दाखवले असे तरुणीचे म्हणणे आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणीने तात्काळ पोलिस ठाण्यात धाव घेत सदर विवाहित पुरुषाच्या विरोधात तक्रार दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक पाठक हे पुढील तपास करत आहेत.


शेअर करा