नगर जिल्ह्यातील ओमिक्रोन पॉझिटिव्ह महिलेबद्दल ‘ महत्वाचे ‘ अपडेट

शेअर करा

नगर जिल्ह्यात नायजेरियामधून श्रीरामपूरमध्ये आलेली महिला ओमिक्रोनने संक्रमित झालेली होती मात्र उपचारानंतर तिचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला तिच्या लहान मुलासह नुकताच डिस्चार्ज देण्यात आलेला आहे त्यामुळे प्रशासनाला एक दिलासादायक बातमी मिळाली आहे.

ओमिक्रोन पॉझिटिव्ह महिलेने शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतले होते. रविवारी त्यांची पुन्हा तपासणी करण्यात आली असता सदर महिला व तिचा मुलगा या दोघांचाही तपासणी अहवाल निगेटिव्ह आढळून आल्याची माहिती तहसीलदार प्रशांत पाटील यांनी दिली आहे.

ओमिक्रोन पॉझिटिव महिलेने कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतले होते तसेच तिच्या कुटुंबातील इतर लोकांनी देखील लसीकरण केले होते त्यामुळे उपचार घेऊन त्या लवकर बऱ्या झाल्या. त्यांना पुढील सात दिवस होम क्वारंटाईन ठेवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे .

नोकरीनिमित्त नायजेरिया तिथे गेलेल्या महिलेसह त्यांचा सहा वर्षाचा मुलगा 15 डिसेंबर रोजी श्रीरामपूर येथे आला होता. त्यानंतर त्यांची कोरोना तपासणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते. स्थानिक प्रशासनाने त्यांच्या संपर्कातील सुमारे पंचावन्न नागरिकांचा शोध घेऊन सर्वांची कोरोना तपासणी केली असून सुदैवाने त्यातील सर्वांचे अहवाल निगेटिव आलेले आहेत.


शेअर करा