‘ रात्रीची संचारबंदी आणि दिवसा हजारोंच्या प्रचारसभा कशाला ? ‘, भाजपला घरचा आहेर

शेअर करा

भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाला घरचा आहेर दिला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढत असताना रात्रीची संचारबंदी आणि दिवसा हजारोंच्या प्रचारसभा कशाला ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे .

देशात ओमायक्रोन व्हेरियंटचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे दिल्ली उत्तर प्रदेश यासह अनेक राज्यांनी पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यास सुरुवात केली आहे, अशावेळी उत्तर प्रदेशात दररोज मोठमोठ्या प्रचारसभा भाजपकडून घेतल्या जात आहेत. हजारो लोकांच्या उपस्थितीत विविध विकास कामांची देखील उद्घाटन करण्यात येत आहेत. वरुण गांधी यांनी ट्विट करून याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे .

वरूण गांधी म्हणतात की, ‘ रात्री कर्फ्यू लावणे आणि दिवसा प्रचारसभेत लाखो लोकांना बोलावणे हे सामान्य लोकांच्या आकलनापलिकडचे आहे ‘.


शेअर करा