महात्मा गांधींबद्दल गरळ ओकली , अखेर कालीचरणच्या विरोधात झाली ‘ अशी ‘ कारवाई की ..

शेअर करा

राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल धर्मसंसद इथे अपशब्द वापरल्याने कालीचरण हा वादात अडकला असून त्याला छत्तीसगड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . कालीचरण याने महात्मा गांधींबद्दल अत्यंत आक्षेपार्ह उल्लेख करत शिवीगाळ केली याचवेळी त्याने नथुराम गोडसे याचे देखील कौतुक केलेले होते . देशभरातुन कालिचरण याच्यावर कारवाईची मागणी झाल्यावर अखेर छत्तीसगड पोलिसांनी त्याला मध्य प्रदेशातून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत .

मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई कऱण्यात आली. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरणला अटक केली आहे. बगेश्वरी धामममधून पहाटे चार वाजता कालीचरणला ताब्यात घेण्यात आलं आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. कालीचरणला दुपारपर्यंत रायपूरला आणण्यात येणार आहे. टिकारपारा पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोण आहे का कालिचरण जाणून घेऊया.

कालीचरण हा मूळचा महाराष्ट्रातील अकोला येथील असून त्याच मूळ नाव अभिजीत धनंजय सारंग आहे . अकोल्यातील जुने शहर भागातील शिवाजीनगर भागातील भावसार पंच बंगल्याजवळ तो राहतो. त्याच्या आईचं नाव सुमित्रा तर वडिलांचं नाव धनंजय सारंग आहे. लहानपणापासून त्याला शिक्षणाची गोडी नव्हती आणि स्वभाव देखील उपद्रवी असल्याने अखेर घरच्यांनी सांगून सांगून त्याच्यापुढे हात टेकले मात्र त्याचा फायदा झाला नाही.

आपले शिक्षणात करिअर होणार नाही हे लक्षात आल्यावर त्याने शाळा सोडली आणि अध्यात्माचा मार्ग धरला. हरिद्वारला जाऊन त्याने दिक्षा घेतली आणि कालीचरण नावाने त्याची नवीन ओळख बनली. एका मुलाखतीत बोलताना कालीचरण म्हणाला होता की , “मला शाळेत जाणं पसंत नव्हतं. शिक्षणात मला कोणताही रस नव्हता. जर मला जबरदस्तीने शाळेत पाठवलं तर मी आजारी पडायचो. सर्वजण माझ्यावर प्रेम करायचे त्यामुळे माझं म्हणणं ऐकायचे. माझी धर्माकडे ओढ असल्याने अध्यात्माकडे वळलो”.

कालिभक्त म्हणून त्याने कालिचरण महाराज नाव धारण केलं. आपण कालीमातेला आई तर अगस्ती ऋषींना गुरु मानत असल्याचं तो सांगू लागला. दोन वर्षांपुर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने कालीचरण महाराज प्रसिद्धीझोतात आला होता. २०१७ मध्ये अकोला महापालिकेच्या निवडणुकीत त्याने प्रयत्न करून पाहिला मात्र कालीचरण महाराजला पराभवाचा सामना करावा लागला.


शेअर करा