सुहागरात्रीच्या वेळीच फोन आला , ‘ ती फक्त माझी..हात लावू नको ‘, अन त्यानंतर..

शेअर करा

देशात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असून अशीच एक घटना मध्यप्रदेशात उघडकीस आली असून सुहागरात असलेल्या दिवशी आलेल्या धमकीनंतर पतीने आपल्या पत्नीच्या प्रियकराचा तब्बल एक वर्षे प्लॅन करून खून केला आहे . धक्कादायक बाब म्हणजे ज्याचा खून झाला तो व्यक्ती हा आरोपीचा साडू असून त्याचे आरोपीच्या पत्नीसोबत लग्नाआधी संबंध होते. मध्यप्रदेशातील आगर-मालवामध्ये ही घटना उघडकीस आली आहे .

मध्यप्रदेशातील आगर-मालवा परिसरात राहणाऱ्या सोहेलचं गेल्या वर्षी लग्न झालं होतं. त्याचा साडू म्हणजेच मेहुणीचा नवरा नूर मोहम्मद याची तीन लग्नं झाली होती. तिसऱ्या पत्नीसोबत तो घरजावई म्हणून तिच्या माहेरी राहायला आला होता. घरजावई म्हणून पत्नीच्या माहेरी राहणाऱ्या नूरच त्याच्या मेहुणीसोबत सूत जुळलं होतं आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते. हा प्रकार नंतर उघडकीस आला आणि नूर याने सासुरवाडी सोडली आणि त्यानंतर नूर याच्या मेहुणीचे देखील लग्न झाले.

लग्न झाल्यानंतर आता आपला संसार सुखाने सुरु होईल अशी मेहुणीचा पती सोहेल याला अपेक्षा होती मात्र सुहागरात असणाऱ्या दिवशीच त्याचा साडू अर्थात त्याच्या पत्नीचा आधीचा प्रियकर नूर याचा सोहेल याला फोन आला आणि त्याने ‘ ती फक्त माझी आहे.. तिच्यापासून दूर रहा ‘ अशी धमकी सोहेलला दिली. सोहेलने पत्नीशी बोलल्यानंतर तिने आधीचा इतिहास उलगडला असता सोहेल याच्या पायाखालील वाळूच सरकली आणि त्याने नूर याला धडा शिकवायचा निर्णय घेतला अन तब्बल एक वर्ष प्लनिंग केली.

सोहेलच्या मुलाच्या एका कार्यक्रमात त्यानं नूरच्या कुटुंबीयांनाही आमंत्रित केलं होतं. नूरच्या घरचे सर्वजण कार्यक्रमाला आले होते, मात्र नूर आला नव्हता. ही संधी साधत आपला चुलत भाऊ जाफरला सोबत घेऊन सोहेल नूरच्या घरी गेला आणि त्याला एकटा पाहून नूरवर गुप्तीनं सपासप वार केले आणि त्याचा खून केला. खून झाला त्या वेळेत सोहेल घरातून गायब असल्याचं पोलिसांना आणि त्यांनी संशयाच्या आधारे चौकशी केली असता सोहेलनं गुन्ह्याची कबुली दिली आहे.


शेअर करा