लष्कराच्या गणवेशात संशयास्पद फिरणाऱ्याला सहज हटकले अन ‘ मोठा कारनामा ‘ उघडकीस

शेअर करा

सैन्याच्या नावाचा वापर करत देशात नागरिकांना फसवण्याचे भामट्यांचे प्रकार आता नवीन राहिलेले नाहीत मात्र अशातच नाशिक इथे एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे .सैन्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना 32 लाखांचा गंडा घालणाऱ्या तोतया लष्करी अधिकाऱ्याला नाशिकमध्ये बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गणेश बाळू पवार (वय 26, रा. कोणार्कनगर) असे या भामट्याचे नाव असल्याचे समजते. विशेष म्हणजे या भामट्याने चक्क लष्करातून सेवानिवृत्त झालेले वडील आणि स्वतःच्या पत्नीला देखील आपण तोतया अधिकारी आहोत ही बाब सांगितली नव्हती.

देवळाली कॅम्प येथील लष्करी हद्दीत मोठ्या थाटात लष्करी गणवेश घालून आणि गाडीवर लष्कराचे लोगो लावून एक भामटा वावरत होता. या भामट्याला मिलिटरी हॉस्पिटल गेटजवळ अडवले असताना त्याने सुभेदार रामप्पा बनराम यांना आपण लष्करात नोकरीसाठी असून हरियाणाच्या इस्सार येथील 115 फिल्ड रेजिमेंटमध्ये पोस्टिंग असल्याचे सांगितले. तपासणी घेतली असताना त्याच्याकडे कोणतेच अधिकृत ओळखपत्र आढळून आले नाही म्हणून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बेरोजगार तरुणांना गंडा घालण्यासाठीच तो अशा पद्धतीने दिखाऊपणा करून तरुण युवकांना हेरून आपल्या जाळ्यात ओढत होता आणि त्यांची आर्थिक फसवणूक करत होता.

गणेश पवार हा बेरोजगारांना लष्करात नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवायचा. नोकरभरतीच्या नावाखाली त्याने दिगंबर मोहन सोनवणे यांच्याकडून 5 लाख तर राजाराम शिंदे यांच्याकडून 4 लाख, नीलेश खैरे यांच्याकडून 3 लाख, परशुराम आहेर यांच्याकडून 15 लाख आणि वैभव बाबाजी खैरे यांच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याचे समोर आले आहे मात्र अर्थातच ही प्राथमिक माहिती असून आकडा आणि फसवल्या गेलेल्या लोकांची संख्या आणखी वाढण्याचा अंदाज आहे .

गणेश पवारचे वडील बाळू पवार हे लष्करातून सेवानिवृत्त झाले असून त्यांना देखील याने असेच फसवले आहे . आपण चक्क लष्करात लेफ्टनंट कर्नल झाल्याचे सांगितल्याने पूर्ण गावात त्याचा सत्कार करण्यात आला होता. गणेशचे स्वतःचे बीए पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले आहे. त्याची पत्नी बीएससी शिकलेली आहे. 2017 च्या बॅचमध्ये आपण लेफ्टनंट झाल्याची थाप मारत त्याने सटाणा येथील गीतांजली यांच्यासोबत जानेवारीमध्ये लग्न केले होते. पतीच्या हातात बेड्या पडेपर्यंत तिलादेखील आपण एका मोठ्या अधिकाऱ्याची पत्नी असल्याचे हा भामटा सांगत होता.


शेअर करा