फक्त चेहरा आणि एक हात उरला, बेकरी चालकाच्या खुनामागचे धक्कादायक रहस्य आले बाहेर : काय होते कारण ?

शेअर करा

बेकरी व्यावसायिकाचा खून तो देखील अत्यंत अमानुषपणे केल्याची घटना नुकतीच उघडकीला आली होती. हा खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकण्याचा देखील प्रयन्त करण्यात आला मात्र शरीराचा छातीवरचा काही भाग आणि एक हात आणि ज्या टेम्पोत जाळले तो मिनी टेम्पो शिल्लक राहिल्याने मृतदेहाची ओळख पटवण्यात यश आले होते.

संजय मारुती काळे (वय 50, रा. शिराळ ता. माढा, जिल्हा: सोलापूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव होते तसेच मयत संजय काळे हे खारी टोस्टचा व्यवसाय करत होते. संजय काळे हे शनिवारी सायंकाळी जेवण करून घराबाहेरील आपल्या अंगणात झोपले होते. त्यानंतर मध्यरात्री ते कोणालाही न सांगता (एम एच 45-6577) मिनी टॅम्पो घेऊन घराबाहेर पडले.

दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी 7 वाजता शेवरे (ता. माढा) येथे उजनी कालव्याच्या रस्त्या लगत टेंभुर्णी – अकलूज रोडजवळ लोकांना एक मालवाहतूक करणारा मिनी टॅम्पो जळालेल्या अवस्थेत आढळला. संजय काळे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला होता. शरीराचे छातीपासून थोडा वरचा भाग शीर आणि एक हात मात्र शाबूत राहिलेला होता.

मारेकऱ्यांनी काळे यांना ठार करून टेम्पोची स्टेफनी अंगावर टाकत मृतदेह पेटवून दिल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही तासांमध्येच पोलिसांनी ह्या घटनेचा तपास लावला असून संजय काळे यांचा खून त्यांच्या मुलानेच केल्याचे स्पष्ट झाले आहे .

पोलिसांनी सध्या या प्रकरणात हत्या झालेले संजय काळे यांचा मुलगा व या प्रकरणातील फिर्यादी आकाश काळे याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. संजय काळे यांच्या वादग्रस्त चारित्र्यामुळे बाप व मुलगा यांच्यात कायम वाद होत असत त्यातूनच हा प्रकार घडला .आकाश याने त्याचे मित्र लक्ष्मण बंदपट्टे व आलम मुलाणी यांची गुन्ह्यात मदत घेतल्याचे कबुल केले.

मुलाणी यांच्यासोबत संजय काळे यांचा आधी वाद झालेला होता त्यामुळे मुलाने मुलाणी यांना आपल्यासोबत घेतले.आकाश याने वडिलांची हत्या करून वाहनावर त्यांचा मृतदेह ठेवून जाळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे. आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


शेअर करा