‘ अन आईवर मुलींनी केले अंत्यसंस्कार ‘, तिन्ही मुले सध्या काय करतात नक्की वाचा

शेअर करा

जन्मदात्या आईला तिच्या पोटच्या पोरांनी तीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले आणि त्यानंतर तब्बल तीस वर्षे चक्क मुली आणि जावयांनी तिला सांभाळले आणि अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. आईच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावली आणि संतप्त बहिणींनी मात्र त्यानंतर दोन्ही भावांना आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही.

उपलब्ध माहितीनुसार, औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील ही घटना असून चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९०, मूळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) असे निधन झालेल्या वृद्धेचे नाव असून त्यांना सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांनी खांदा दिला आणि मुलींनी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केले.

चंद्रभागाबाईंनी तिन्ही मुलांसह मुलींना अत्यंत कठीण अशा परिस्थितीत शिक्षण दिले. एक मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी आणि दुसरा उच्च न्यायालयात क्लार्क तर तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. तिघांचीही परिस्थिती अत्यंत चांगली असून सुखाच्या काळात आईला मुलांनी आपल्यापासून दूर केले आणि त्यांच्यावर मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांच्या घरी राहण्याची वेळ आली तरीही आईला मरतेवेळी तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही मुले आईला बघायला फिरकले नाहीत आणि अखेर या माऊलीची शेवटची इच्छा देखील अपूर्ण राहिली.

मुलगी सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे यांनी ‘ तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाले तेव्हापासून माझ्या भावांनी आईला सोडून दिलेले आहे. सुरुवातीची दहा वर्षे ती आम्हा बहिणींकडे राहत असे तर गेल्या वीस वर्षांपासून ती माझ्याकडे हाेती. मुलगी या नात्याने मी तिचे सर्व कर्तव्य पूर्ण केले. भाऊ मात्र कर्तव्य विसरले. असे निर्दयी भाऊ व मुले कुणाला मिळू नयेत ‘ अशा शब्दात राग व्यक्त केला आहे .


शेअर करा