पुणे हादरले..वृद्ध आईचा चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून मुलाने केला खून अन त्यानंतर..

शेअर करा

महाराष्ट्रात अनेक धक्कादायक घटना समोर येत असून अशीच एक घटना पुणे शहरात उघडकीस आली आहे. नोकरी गेल्याने खर्चाची तजवीज होत नसल्याने एका इंजिनीअरने आपल्या आईचा खून करून स्वतः देखील आत्महत्या केली आहे .पुण्यातील धनकवडी परिसरात ही घटना उघडकीस आली असून इंजिनिअर तरुणाने 76 वर्षीय आईला औषधांचा ओव्हर डोस देऊन तिचा चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून तिचा खून केला. सदर प्रकार उघडकीस येताच परिसरात खळबळ उडालेली असून सहकारनगर पोलीस तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, निर्मला मनोहर फरताडे असं हत्या झालेल्या आईचं नाव असून गणेश मनोहर फरताडे असं आत्महत्या केलेल्या आरोपी मुलाचं नाव आहे. मृत गणेश याने मध्यरात्री आईची हत्या करून आपल्या मावस बहिणीच्या मोबाइलवर मेसेज पाठवून आत्महत्येचे कारण देत स्वत:ही आत्महत्या केली आहे. गणेश आपल्या आईसोबत धनकवडी परिसरात वास्तव्याला होता मात्र काही दिवसांपूर्वी त्याची नोकरी गेली असल्याने तो आर्थिक संकटाचा सामना करत होता.

गणेश याच्या वडिलांचे 5 वर्षांपूर्वीच निधन झालेले होते तर आईचे देखील विविध आजारावर उपचार सुरु होते. आईचा सांभाळ आणि उपचाराचा खर्च त्यालाच करावा लागत होता मात्र त्यातच त्याची नोकरी देखील गेली आणि यात त्याच्यावर कर्ज देखील झाले.कर्जाची परतफेड कशी करायची आणि आईच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे ? याच चिंतेतून त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला मात्र आपण आत्महत्या केली तर आईचा सांभाळ कोण करेल ? याचीही त्याला चिंता होती.

वृद्ध आईला गणेश याने औषधांचा ओव्हर डोस दिला आणि निपचीत पडलेल्या आईचा चेहरा प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून त्याने आईची हत्या केली. आईचा मृत्यू झाल्याचे समजताच त्याने छतावर जाऊन गळफास घेतला मात्र आधी पहाटे दोनच्या सुमारास त्याने ‘बेरोजगारी आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करत आहोत’, असा मेसेज आपल्या मावस बहिणीला आणि काही नातेवाईकांना पाठवला आहे. घटना उघडकीस आल्यावर परिसरात हळहळ व्यक्त केली आहे .


शेअर करा